नाशिक : भिम नगर येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाशिक जिल्ह्याला विशेष योगदान होते त्यांच्या अथांग परिश्रमातून HAL कारखाना ओझर येथे बांधण्यात आला त्यामुळे नाशिक मध्ये विशेष रोजगार निर्मिती झाली होती त्यामुळे येथे नागरिकांच्या आर्थिकविकासात मोठा भर पडला.
पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे,प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती साजरी केली. यावेळी पीपल्स रिपब्लिक पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,निवृत्त महाराष्ट्र कारागृह विभाग अधिकारी डी सी पी, जी के गोपाल साहेब,कालिदास शिंदे,जावेद शेख,सलमान शेख,भागवत डोळस,शिरीष गांगुर्डे,बिलाल शेख, अबिद शेख,रफिक टकारी, अल्लाउद्दीन अन्सारी,रईस टकारी, रमेश पाईकराव,भरत कर्डक,मनोज अहिरे,प्रशांत पाटील,शरद सोनवणे, सत्तारभाई शेख,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक मध्ये संविधानदिन साजरा करण्यात आला
निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना करता येणार त्याच केंद्रांवर मतदान; पोलिसांसाठी असणार पोस्टल वोटिंग सेंटर
येवला येथील मुक्तीभुमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू