April 30, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

ट्रिपल इंजिन सरकार अश्या प्रकरणात तरी लोकांच्या भावनांशी खेळू नका… राहुल दिवे

24 तास उलटून गेले तरी अपघातग्रस्तांना राज्य शासनाने-केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अजून सरकार च्या तिजोरीत….

काल 15 ऑक्टोबर रोजी समृद्धी महामार्ग (जांबरगाव) वैजापूर येथे झालेल्या भीषण अपघातात नाशिक च्या मरण पावलेल्या अपघातग्रस्तांना अजून शासनाने मदत केली नसल्याने मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी आज राहुल दिवे आकाश छाजेड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना मदतीसाठीचे निवेदन देण्यात आले. 24 तास उलटून गेले तरी अपघातग्रस्तांना राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत अजून मिळाली नसल्याने जिल्हाधिकारी यांनी सदर विषयांवर बोलणे टाळल्याचे दिसून आले.

जखमी लोकांना चांगले उपचार मिळाले पाहिजे ह्या भावना नातेवाईकांनी ह्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त केल्या. शासनाने 50 हजार रु प्रत्येकी उपचारासाठी, राज्य शासनाने 5 लाख तर केंद्र सरकारने 2 लाख देऊ असे जाहीर करून 24 तास पूर्ण झाले तरी अजून निदान उपचारासाठी मदत मिळावी अशी अपेक्षा नातेवाईक करत आहे परंतु तहसीलदार व प्रशासकीय अधिकारी यांना याबाबत माहिती नसल्याचे नातेवाईकांना सांगितले जात आहे. तरी त्वरित मदत मिळाली नाही तर नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे आव्हान राहुल दिवे, आकाश छाजेड यांनी अपघातग्रस्तांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन द्वारे दिले आहे !