April 15, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुध्दलेणी परिसरातील बुध्द स्तुपामध्ये धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व अशोका विजया दशमी दिन

त्रिरश्मी बुध्दलेणी परिसरातील बुध्द स्तुपामध्ये भव्य बुध्दरूपा समोर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व अशोका विजया दशमी दिनाचे औचित्य साधून पुज्य भिक्खू संघाकडून सकाळी ठिक 9.05 मिनिटानी त्रिसरण पंचशील ग्रहण केले.या प्रसंगी पुज्य भन्ते अश्वजित(थेरो)यांची विशेष धम्मदेसना उपस्थित श्रद्धावान उपासकांनी सहपरिवार ग्रहण केली.

14 ऑक्टोबर 1956 अशोका विजया दशमीला बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सकाळी 9.05 मिनिटानी धम्म दिक्षा दिली होती. त्यामुळे प्रत्येक रविवारी बुध्द विहारात सकाळी याच वेळी समाज बांधवाने नियमित बुद्ध वंदना घेतली पाहिजे असे आवाहन पुज्य भन्ते अश्वजित (थेरो)यांनी यावेळी केले.