January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

मुंबई महानगरपालिका शिवसेना आणि वंचितचे ठरले पण….

मुंबईः ठाकरे गटाची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असं चित्र मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी झालेली आहे.पण

प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली ते म्हणाले, “मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचीत बहुजन विकास अघाडी ८३ जागा लढण्याची तयारी केली होती, शिवसेना जेवढ्या जागा सोडेल तेवढ्या जागा लढवू अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते म्हणाले येणाऱ्या महापालिका निवडणुक शिवसेनेसोबत लढण्याचा निर्णय झालाय, मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाना देखील सोबत घेतलं पाहिजे त्यावर आम्ही म्हणालो आमचा त्याला विरोध नाही.

महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा वंचितला सोबत घेण्यासाठी विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यावर  मला सुत्रांकडून समजत आहे की या युतीला राष्ट्रवादीचा उघड विरोध आहे. तर काँग्रेसचा छुपा विरोध आहे. असं मला कळालं आहे. या पक्षाना वाटत नाही की गरीब मराठा सत्तेत यावा, म्हणून वंचितला विरोध आहे. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.