तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे,
फरक इतकाच तू,घरात भीमप्रतिमा वर्षभर टांगून दिली मी मात्र,
माझे जीवन हे भीमकार्याला समर्पित केले आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तू, तूझ्या आतिल किचनमध्ये देव्हारा ठेवला आहे
मी मात्र,माझे घर भिम बुद्ध विचाराने सजविले आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे,
फरक इतकाच तू, विधी पुरता धम्म स्विकारला आहे
मी माझे जीवनात 22 प्रतिज्ञाचा धम्म अनुसरला आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तू, जेव्हा जेव्हा तुझ्यावर अन्याय होतो तेव्हा तुला समाज आठवतो,
मी मात्र,माझ्या धम्मबांधवाचा आजन्म सेवक झालो आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तुला बुध्द विहारात जायची लाज वाटते
मी मात्र,माझ्या परिवाराला धम्मसेवेची गोडी लावली आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तू,तुझ्या मुलाच्या हातात,गळ्यात, पायात अजूनही गुलामीचे धागे दोरे बांधले आहे
मी माझ्या लहान मुलाला त्रिसरण पंचशिलाचे बाळकडु पाजले आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तू,एकदिवस जयंती साजरी करून विसरून जातो बा भिमाला
मी प्रबुध्द भारत मिशन कार्य पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावतो आहे
तुझे ही बा भीमावर प्रेम आहे,
माझे ही भीमबाबांवर प्रेम आहे
फरक इतकाच तू जयंती झाली की जातो मनुवादीच्या कळपात,
मी मात्र वर्षभर वाड्या वसत्यावर पेरत जातो भिमसूर्याचा प्रकाश….
शेवटी,तुझे ही बा भिमावर असेच प्रेम राहु दे,
माझे ही भिमबाबांवर असेच प्रेम राहील
चल गड्या, आता तुझे बेगड़ी भिमप्रेम सोडून दे
माझ्या सोबत सच्चा बुध्द भिम विचारांचा खरा पाईक हो
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण