November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

मार्गशीष पौर्णिमा

मार्गशीष पौर्णिमेला भगवान बुद्ध राजगृहाला गेले. तेव्हा श्रेणीय बिंबिसार राजाने यष्टीवन दान दिले. भगवान बुद्ध आल्याचे राजाला समजले तेव्हा त्याच्या दर्शनासाठी राजा व प्रजा गेली. सर्वांनी भिक्खु संघासह भगवान बुद्धाने अभिवादन केले. त्रिसरण पंचशील ग्रहण करून त्रिरत्नाचा अंगीकार केला. त्यानंतर राजाने बुद्ध प्रमुख भिक्खु संघाला उद्याचे भोजनदान स्वीकारण्याची नम्र विनंती केली. तथागत बुद्ध सहितभिक्खु संघ भोजनास गेले. भक्तीभावे आदर सत्कार केला. भोजन दान संपल्यावर धम्म उपदेश श्रवण करून राजाने बुद्ध प्रमुख भिक्खु संघाला वेळूवन दान दिले.

या मंगलमय दिनी सर्व लहान थोर अष्ठशील उपोसथ धारण करतात, धम्म उपदेश श्रवण करतात, दान पुण्य आदि करतात, ध्यान भावना चिंतनमनन करून २४ तासाचे वृत्त काटेकोरपणे पालन करून अनंत पुण्याला संपादन करतात.