November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

मार्गशीर्ष पौर्णिमा महोत्सव – त्रिरश्मी बुद्ध लेणी, नाशिक

नाशिक येथील सर्व उपासक उपासिकांना कळविण्यात येते की, मार्गशीर्ष पौर्णिमा महोत्सव निमित्त गुरुवार दि. ०८ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. भिक्खू एस.आर इन्दवंस महाथेरो (औरंगाबाद) यांच्या विशेष धम्म देसनेचे आयोजन केले आहे. मार्गशीष पौर्णिमेला बौद्ध धम्मामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मार्गशिर्ष पौर्णिमेला भगवान बुद्धांनी बेभान झालेल्या नालगिरी या हत्तीवर आपल्या मैत्रीने व महान करुणेने विजय मिळविला. या पौर्णिमेस भगवान बुद्ध राजगृहात गेले असता श्रेणीय बिम्बिसार राजाने भगवान बुद्धांना यष्टीवन (वेळूवन) दान केले असे महत्व या मार्गशीर्ष पौर्णिमेला आहे तरी आपण या पौर्णिमा विशेष महोत्सवा निमित्त आयोजित धम्म देसनेचा लाभ घेऊन तन, मन, धनाने सहकार्य करुन महान पुण्य संपादन करावे. असे आवाहन नाशिक भिक्खु संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

  • विशेष धम्म देशना • डॉ. मिक्सू एस. आर. इंदवंश महाथेरो, औरंगाबाद
  • कार्यक्रमाची रूपरेषा : सकाळी ११ ते १२ : .. भिक्खु संघाचे भोजन दान
  • स्थळ : बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी, पाथर्डी शिवार, मुंबई आग्रा हायवे, नाशिक – ४२२०१० 

दुपारी १२ ते १ : उपासक उपासिकांचे भोजन ( भोजन दान दायक कालकथित डॉ. रामचंद्र धोंडिया सोनकांबळे यांच्या पुण्यस्मरणार्थ )

दुपारी १ ते १.३० : वंदना व सुक्त पठन

दुपारी १.३० ते २.३० : विशेष धम्म प्रवचन

दुपारी २.३०: भिक्खु संघाचा आशिर्वाद देऊन कार्यक्रमाचे समापन

टिप : पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून यावे. ऑनलाईन आर्थिक दान केल्यानंतर स्क्रिनशॉट पाठवावा.

● आयोजक : नाशिक भिक्खु संघ

ऑनलाईन आर्थिक दान करणेकरीता  गूगल पे किवा फोन पे  नंबर वर करावे आणि  संपर्क करावा. ९४२२२६१४४४ , ९१७५९५७२५३