July 29, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मनोज भाई संसारे निधन : बहुजनांचा नेता हरपला रिपब्लिकन चळवळींतिल झुंजार नेतृत्व हरपलं, मनोज भाई संसारे यांचे दुखत निधन.

Manoj bhai Sansare

Manoj bhai Sansare

मनोज संसारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे यांची ख्याती होती.

मनोज संसारे हे मुंबई महापालिकेतील अपशांचे गट नेते व माजी  नगरसेवक  होते. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारेंच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज संसारे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरोधात अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संसारेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज गेल्या काही दिवसांपासून मनोज संसारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. झुंजार नेतृत्व हरपल्याने आंबेडकरी समाज शोकसागरात बुडाला आहे.

आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट चे अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आनंद शिंदे काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश साळवे तसेच राष्ट्रीय दलित पॅंथर संघटनेचे दीपक केदार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप नाशिक महापालिकेचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे, पीपल रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे गणेश भाई उनवणे शशीबाई उनवणे आयुष्यमान रिपब्लिकन नेते सुनील खांबे साहेब माजी नगरसेवक हरीश भडांगे तसेच नाशिक जिल्हातील नाशिक टीमचे अनेक मान्यवर तसेस राज्यातील अनेक सनदी अधिकारी एससी एसटी चे अधिकारी वर्ग यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.