July 29, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

स्वाभिमानी रिपब्लिकन हरपला

manoj bhai sansare

manoj bhai sansare

भाई मनोज संसारे यांचे दुःखद निधन

दिनांक 12 मे 2023 रोजी अत्यंत दुःखद बातमी,पँथर ,मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक,तळमळीचे कार्यकर्ते, इतरांच्या सुख दुःखात आपुलकीने साथ देणारे ,अन्यायाविरुद्ध सतत बंड पुकारणारे, पँथर चळवळ मुंबईत वाढवणारे, भाई संगारे यांचा आशीर्वाद असणारे,त्यांच्या सोबत वावरणारे,रिपब्लिकन ऐक्याचे साथीदार, युथ रिपब्लिकनचे अध्यक्ष, पुढे स्वतःचा पक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र भर उभा करण्याचे स्वप्न उरात बाळगणारे, त्यासाठी झंझावाती दौरे।महाराष्ट्र भर काढणारे. झुंझार नेतृत्व ,बांधकाम व्यावसायिक,
6 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतातून येणाऱ्या भीम अनुयायांना स्वखर्चाने जेवण देणारे,त्याची रहाण्याची सोय करनारे,प्रचंड धाडस असणारे,
6 डिसेंबर रोजी चैत्य भूमी जवळील शिवाजी पार्क येथे मोठया प्रमाणात बुद्धाची मूर्ती ठेवणारे, बाबासाहेबांच्या जीवनावर देखावा उभा करणारे,चांगली उंची आणि बलदंड शरीर लाभलेले त्यात त्यांची कोरीव दाढी अधिकच त्यांचा रुबाब वाढवत होती.
परखड आणि पट्टीचे वक्ते, भाई संगारे यांचा वारसा चालवणारे
स्वाभिमानी रिपब्लिकन भाई मनोज संसारे यांचे आज दिनांक 12 मे 2023 रोजी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी त्यांच्या वडाळा येथील घरून निघून त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथील स्मशानात अंत्यसंस्कार होतील.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत भावपुर्ण श्रद्धांजली