July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सच्चा आंबेडकरवादी नेता हरपला.. मनोज संसारे यांचं दीर्घ आजाराने निधन आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली

 स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय नेते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी त्यांच्या वडाळा येथील घरून निघून त्यांच्यावर दादर चैत्यभूमी येथील स्मशानात अंत्यसंस्कार होतील.

 स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. एक झुंझार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे ओळखले जायचे. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते.

मनोज संसारे यांनी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. सध्या ते स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष-‘युथ रिपब्लिकन पक्ष स्थापन केला होता रिपब्लिकन पक्षाचे झालेलं ऐक्य आणि 6 डिसेंबरला नेत्यांचे उधळलेले स्टेज आजही मला आठवतात. तेव्हाही अशीच विचित्र राजकीय स्थिती होती. रिपब्लिकन पक्षाला कोणतेही पक्ष विचारानासे झाले होते. तरीही नेत्यांची तोंडे एकमेकांच्या विरूध्द दिशेला होती. त्या काळात ऐक्यासाठी तू घेतलेला पुढाकार, दाखवलेले धाडस आणि त्यातून निर्माण झालेल्या कटूता आपण एकत्रपणे अनूभवल्या आहेत. सर्वांचा विरोध पत्करून तू वडाळा विभागात तूझे स्वतंत्र आस्तित्व निर्माण केलेस त्याला तूझ्या व्यक्तीगत योगदानाची किनार आहे. आंबेडकरी चळवळीतील गाणी तू सुंदर गात होतास, तूझ्या सारखा उत्तम स्वयंपाक करणारा मी पाहिला नाही, तू सगळ्यासांठी स्वतः बनवलेली बिर्याणी आजही मला आठवते. रिपब्लिकन ऐक्याच्या प्रक्रियेतील आर. ए. किडवाई मार्ग वडाळा पोलिस स्टेशन असो की कोरबा मिठागर पोलिस ठाणे असो तीथे झालेली सर्व राडेबाजी माझ्या डोळ्यासमोर आजही आहे. तूझा शिवाजी पार्क,चैत्यभूमी आणि महाडच्या भूमिवरचा वावर सर्वांच्या मनाला नेहमीच चटका देत राहील. तूझे रिपब्लिकन चळवळीतील कलावंतांशी जीवाभावाचे नाते होते. अशा चौफेर व्यक्तीमत्वाचा तू होतास, रिपब्लिक पक्षाचा माझ्या नजरेतील इतिहास जेव्हा केव्हा मी लीहीन तेव्हा तूझ्या नावाचे पान त्यात नक्कीच असेन. काही काळ का होईना पण आंबेडकरी चळवळीतील विचारांच्या लढ्यात आपण एकत्र साक्षीदार होतो याचे समाधान मला आहे. तूझे जाण्याचे हे वय नव्हते परंतू काळाने तूला हिरावून न्हेले. भावपूर्ण आदरांजली! माझा निळा सलाम….

मनोज संसारे यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

मनोज संसारे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संसारे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरुद्ध अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाहिली आहे.