July 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन Mahabodhi Mahavihara liberation movement in Nashik

Mahabodhi Mahavihara liberation movement in Nashik

Mahabodhi Mahavihara liberation movement in Nashik

नाशिक ( ०५ मार्च २०२५ ) : नाशिक मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन विभागीय महसूल आयुक्त नाशिक रोड येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी एक दिवसीय धरणे आंदोलनाला प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती व प्रतिमांना पुष्पहार घातले त्यानंतर भंते धम्मरतन धम्म उपासक धम्मरक्षित बोधी इंगोले यांनी त्रिशरण पंचशील देऊन या धरणे आंदोलनाची सुरुवात केली भालशंकर साहेब संतोष जोपुळकर नंदकिशोर साळवे गंगाधर अहिरे सर यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनासंदर्भात तसेच 1949 चा मंदिर कायदा रद्द करण्यासाठी पुढे कोणते नियोजन करायचे कोणते धोरण आखायची याबद्दल सखोल माहिती या सर्वांनी आपल्या प्रबोधन विचारसरणी मधून यासंदर्भात प्रवचन दिली.

त्यानंतर अप्पर विभागीय महसूल आयुक्त यांना एक दिवशी धरणे आंदोलनाचा उद्देश काय होता या संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदन देताना बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नाशिक जिल्हा समितीचे मुख्य प्रचार अरुण शेजवळ शशिकांत भालेराव आणि सर्व सदस्य समितीमधील नावे सिद्धार्थ भालेराव, आकाश भालेराव, महेंद्र साळवे, विकास भोळे, चंद्रकला गांगुर्डे, शैलाताई उगाडे, रोहिणी जाधव, गंगाधर अहिरे, संजय तायडे, महेंद्र तायडे, उषाताई अहिरे, राजश्री शेजवळ, सुरेखा बर्वे, सुभाष राऊत, अशोक घायवटे, अशोक मेश्राम, निफाड चे सुरेश गांगुर्डे पत्रकार भास्कर साळवे पत्रकार यांनी निवेदन दिले.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात नगरसेवक आयू. हरीश भडांगे, नगरसेवक आयू. प्रशांत दिवे माजी नगरसेवक आयु. संजय आडांगळे, शशीभाई उनवणे, शेखर भालेराव, संजय भालेराव, आबासाहेब डोके, बिपीन मोहिते, विशाल गांगुर्डे, सागर रिपोर्टे, बंटी गांगुर्डे, प्रवीण जाधव, बाळासाहेब साळवे, सनी जगताप, पियुष गांगुर्डे, राहुल जाधव, तसेच आंबेडकरी विचाराच्या पक्ष संघटना यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला

तसेच या धरणे आंदोलनाची सूत्रसंचालन प्रशांत पगारे सर्वांचे स्वागत आकाश भालेराव व आभार शशिकांत भालेराव यांनी केले . या धरणे आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था बौद्ध विहार महिला मंडळ नाशिकरोड जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी मातृभूमी प्रबोधन संस्था भारतीय बौद्ध महासभा तसेच शासकीय व अशासकीय सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया यांचे पण खूप मोठे योगदान एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी मिळाले.तसेच एक दिवसीय धरणे आंदोलाचा शेवट पी के गांगुर्डे गुरुजी यांनी सरणंतय घेऊन केले.