November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

꧁ भगवान बुद्धाचे धम्मविचार ꧂

माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून असते.

दुष्ट वासनांवर मनाचा सतत पहारा ठेवणे हे सम्यक स्मुर्तीचे दुसरे नाव आहे.

सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच.

मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रुलाही प्रेमानं जिंका.

वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमानेच मात करता येते.

द्वेषाने द्वेष शमत नाही, तर तो फक्त क्षमाशीलतेनेच शांत होऊ शकतो.

व्यक्तीगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टीचा पाया आहे.

तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वत:च्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची किर्ती चिरकाल टिकेल.

राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजाही धार्मिक होते.

ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ठ सुसंस्कृत मनुष्य होय.

आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे.

समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

विश्वास हे सर्वश्रेष्ठ नातं आहे.

निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे.

कर्तव्यासाठी कधीही अयोग्य वेळ नसते.

माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मार्ग म्हणजे पंचशील होय.

जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे सेवा पुरवून ते दूर करण्यासाठी करूणा आवश्यक आहे.

निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे.

केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हाच मैत्रीचा खरा अर्थ आहे.

शहाणपण (समज) आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नांव आहे.

आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार नेहमी तपासून पाहिले पाहिजे. कारण आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते.

निब्बाणप्रत पोहचण्यास पुरूषांइतक्या स्त्रियासुद्धा समर्थ आहेत.

सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.

जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाला अस्तित्वाचे प्रयोजनच काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय?

जो राखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही, असा मनुष्य निब्वाण मिळवू शकतो.

प्रथम स्वत:ची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वत:ला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.

जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे.

जो मनुष्य परदोषच पाहात राहतो आणि स्वत:चे दोष उघड होताच चिडू लागतो, त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूरदूर जात राहतो.

🙏 नमोबुद्धाय 🙏

꧁ Lord Buddha’s Thoughts ꧂