November 28, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

22 जुलै 1947 रोजी तिरंगाला संविधान सभेने मान्यता दिली होती.

21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले.

नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात 21 जुलै हा दिवस महत्त्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला. यावेळी तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला गेला. या दिवशी संविधान सभेने तिरंगा हा देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला आणि त्याला मान्यता दिली. 19व्या शतकात, जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता, त्यावेळी देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यकर्त्यांकडून अनेक प्रकारच्या झेंड्यांचे प्रयोग केला जात होता. परंतु सन 1857 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात झाली तेव्हा असा विचार केला जात होता की देशासाठी समान ध्वज आवश्यक आहे. तथापि काही लोकांचे म्हणणे आहे की, 22 जुलै 1947 रोजी तिरंगाला संविधान सभेने मान्यता दिली होती. (know the whole history of the national flag of india )

तिरंगा कसा आला

1931 हे वर्ष राष्ट्र ध्वजाच्या इतिहासात संस्मरणीय असल्याचे म्हटले जाते. तिरंगा ध्वज देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या ध्वजाने सद्य तिरंगाचा पाया तयार केला होता. हा ध्वज भगवा, पांढरा आणि मध्यभागी गांधीजींच्या चरखासह होता. त्यानंतर, 21 जुलै 1947 रोजी, संविधान सभेने हा ध्वज भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात एकच बदल झाला. तिरंग्यात सूत कात्याच्या जागी अशोक चक्र दाखविण्यात आले. (know the whole history of the national flag of india )