दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी कान्हेरी बौद्ध लेणी वर माघी अमावास्या निमित्ताने बौद्ध संस्कृतीच्या पाउलखुणा जपण्यासाठी महाधम्मोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
महाधम्मोत्सव हा कार्यक्रम आयोजन करण्याचे कारण आहे इथला सांस्कृतिक दहशतवाद कान्हेरी लेणी वर दर वर्षी काही समाजकंटक येवून बौद्ध लेण्यांना शिवाची लेणी किंवा शंकराचे मंदिर समजून त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे इथे आपले उपक्रम झाले पाहिजे या हेतून हा महाधम्मोत्सव आहे.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल हे या कार्यक्रमाचे आयोजक असून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आपण आपल्या परीवारासाबोत इथे येवून ह्या कार्यक्रमाला यशस्वी करावे.
लाखो बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पाहिजे यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे..हा बौद्धांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे..
भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत तालुका शाखा अंबरनाथ यांच्या सौजन्याने मोठ्या संख्येने आपण तेथे उपस्थिती दाखवायची आहे..आणि म्हणूनच आपण बस घेऊन जाणार आहोत..बस लुंबिनी बुद्ध विहार, नवरे नगर अंबरनाथ पूर्व येथून निघणार आहे..ज्यांना कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव तालुका अध्यक्ष आदरणीय अशोक चन्ने गुरुजी यांच्या कडे द्यावे..
समता दलाची उपस्थिती लक्षणीय असावी ..
अशोक चन्ने गुरुजी:-7758028822..
Kanheri Buddhist Caves Maha Dhammotsava
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024