जय भीम या नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या निमित्ताने न्यायमूर्ती चंद्रू यांच्या विषयी थोडं….
आपण जय भीम चित्रपटातील सूर्या पहिला व तो सर्वाना भावालाही….ज्या सत्यकथेवर आधारित चित्रपट आहे त्याच्या रिअल हिरो विषयी हीं चर्चा व त्यांच्या कार्याची माहिती असायला हवी म्हणून…..
न्यायमूर्ती चंद्र हे लिगल वर्तुळातील आदरणीय व्यक्तींपैकी एक होत. समाजातील गोरगरिबांच्या केसेस विनामूल्य लढण्यासाठी ओळखले जातात तसेच त्यांच्या न्यायनिवाड्यासाठी ही ओळखले जातात..
सरासरी एक न्यायाधीश आपल्या कारकिर्दीत सुमारे दहा ते वीस हजार निकाल देण्यासाठी ओळखला जातो तर न्या. चंद्रू यांनी त्यांच्या गौरवशाली न्यायिक कारकिर्दीत तब्बल 96 हजार निवाडे सुनावले आहेत. ज्यात 25000 गरीब महिलांना रोजगार मिळवून देणारा निकालही दिला आहे.
सरकारने न्यायाधीश आणि अन्य सार्वजनिक व्यक्तींच्या गाड्यांवरील लाल दिवा हटवण्याआधी त्यांनी ते स्वतःसाठी केले होते. त्यांनी वैयक्तिक सुरक्षारक्षक ठेवण्यासही नकार दिला होता तसेच न्यायालयात “माय लॉर्ड” संबोधण्यास ही नाही म्हटले होते.
ते 2013 मध्ये न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले आणि त्यांनी आपली अधिकृत गाडी सरेंडर केली व घरी परतण्यासाठी उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यांनी तारांकित हॉटेल व डिनर ही नाही स्वीकारला.
जस्टीस चंद्रू यांचे हे महान कार्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरित झाल्याने घडले आहे…
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.