जयभीम आता ते म्हणू लागले
आरक्षणाचे बिगुल जेंव्हा वाजू लागले।।धृ०।।
दीन दलीतांवर अत्याचार त्यांनी केले किती
पुतळे भीमाचे त्यांनी ते फोडले किती
काव काव करीती आता ते काळे डोम कावळे।।१।।
माय भगिनींची लूटती आब्रू
भर रस्त्यावरी
ठार मारीत होते ते भुकेल्या जनावरां परी
कायदा अट्रोसिटीचा रद्द करा आता म्हणू लागले।।२।।
मन द्वेषाने जातीच्या होते ते फुत्कारले
रक्त डोळ्यात त्वेषाने होते ते संचारले
प्रगती पाहून आमची ते सारे जळू लागले।।३।।
धम्म षुध्दाचा दिधला वसंता
भीमाने आम्हां
केली पूर्ण जगाची आम्ही परीक्रमा
ज्ञान पंखाने आकाशी निळ्या
मुक्त ऊडू लागले।।४।।
।।समाप्त।।
कवि:-वसंत पां.हिरे. (देवरगांवकर)
संपर्क:-9594096699.
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण