November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

समता सैनिक दलाच्या वेबसाईटचे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनी उद्घाटन

बुद्धाच्या काळाप्रमाणे भारत महासत्ता व्हावी- आद. भीमराव आंबेडकर
**
मुंबई – भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी , दादर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.भीमराव य.आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व समता सैनिक दला च्या वेबसाईट चे उद्घाटन करण्यात आले. भगवान बुद्धांच्या काळात जसा भारत जागतिक महासत्ता होता तसा पुन्हा बनो असे प्रतिपादन आद. भीमराव य आंबेडकर यांनी केले. तसेच भारतीय संविधानाने दिलेले अधिकार , हक्क बहुमताच्या जोरावर हिरावून घेण्याचे कारस्थान चालु असल्याने आम्ही खरेच स्वातंत्र्यात आहोत का असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगून लवकरच आद. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलाचे राष्ट्रीय अधिवेशन पानिपत येथे घेणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी दिली. या प्रसंगी आद. भंते सुमेध जी, अशोक कदम (असि. स्टाफ ऑफिसर), उत्तम मगरे(मुंबई प्रदेश अध्यक्ष), मेजर जनरल अनुक्रमे डी एम आचार्य, प्रदीप कांबळे, चंदाताई कासले, प्रवीण निखाडे, वैशालीताई अहिरे, उमेश बागुल, वासुदेव हिवराळे, रविंद्र इंगळे, मोहन सावंत, विलास खाडे इत्यादी समता सैनिक दलाचे अधिकारी, सैनिक व भारतीय बौद्ध महासभेचे मुंबई,महाराष्ट्र शाखेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता सैनिक दलाची वेबसाईट   http://samatasainikdalindia.org/
समता सैनिक दलाचे व लेणी संवर्धन टीम चे रविंद्र मिनाक्षी मनोहर सावंत , संदीप पाटील ,दिनेश धबाले , अश्विनकुमार धसवाडीकर ,मुकेश जाधव यांनी तयार केली आहे. ही वेबसाईट जगातील सर्व प्रमुख भाषेमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे व त्यांच्या पत्नी यांनी समता सैनिक दलाचे 30 ड्रेस दान दिले.