August 7, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नालंदा विहारात नवदापत्यांनी अंतर जातीय विवाह करून बौध्द धर्म स्वीकारला

जालना येथील नालदा बौध्द विहारात नवदापत्यांनी बौद्ध धम्म पध्दतीने अंतर जातीय विवाहकरण्यात आला.

नालंदा विहार येथील भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र यांच्या आदेशाने काल दि. ८ रोजी वधु आकांक्षा बिपिन ठाकुर ब्राह्मण समाज, (मध्यप्रदेश) तर एकबाल उस्मानभाई मुस्लिम समाज ( गुजरात) दोघेही अंतर जातीय विवाह बंधनात एकनिष्ठ होऊन त्या नवदापत्यांनी स्वधर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्विकारला

आम्ही बौद्ध धम्म स्विकारला आजच्या युगात बौध्द धर्म हाच मानवजातीला तारणारा असुन प्रज्ञा, शिल, करुना यांचे आचरण मानवी जिवनात खुप उपयोगी असल्याचे नवदापत्यांनी सांगितले व नालंदा बौध्द विहारात सर्व कायदेशीर बाबी पुर्ण करून या नवदापत्यांनी बौध्द धर्म स्वीकारला या वेळी त्यांना बौद्ध धम्मानुसार भदंत शिवली शाक्यपुत्र यांनी पंचशील, बाविस प्रतिज्ञा सह धम्मदिक्षा देउन त्यांचा मंगल परणय संपन्न करण्यात आला. या प्रसंगी अँडोव्हकेट, मोकळे, सर व राउत यांची उपस्थिती होती.