July 29, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

असा IAS होणे नाही.

IAS is not like that.

IAS is not like that.

# आपल्या हातात झाडू घेऊन विहार स्वच्छ करणारा असा IAS होणे नाही
# गरजू व होतकरू मुलांतील काहिंना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वत: उचलणारा तर काहिंना शिक्षणासाठी परदेशात पाठवणारा
असा IAS होणे नाही
# भिक्खु संघासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र असावं म्हणून आपल्या पत्नीच्या अर्थसहाय्याने ते बांधून ते समाजाला अर्पण करणारा असा IAS होणे नाही
# आपल्या सोबत धम्माच्या चळवळीत काम करणाऱ्या मुलामुलींना घम्माचे चांगले ज्ञान मिळावे यासाठी १२ मुलामुलींना परदेशात पाठवणारा असा IAS होणे नाही
#बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती (१२५ वी ) भव्यदिव्य झाली पाहिजे यासाठी वर्षभर संपुर्ण मुंबईतील गोरगरीब वस्त्यांमध्ये जाऊन २००० मुलामुलींना सोबत घेऊन बांद्रा येथे दिमाखदार सोहळ्यात लाखोंच्या उपस्थितीत जगभरातील सुप्रसिध्द मान्यवर व भारतातील १२५ पेक्षा अधिक आयएएस आयपीएस आयआरएस आयएफएस जेष्ठ सनदी अधिकाऱ्यांना एकत्र आणून धुमधडाक्यात जयंती साजरा करणारा असा IAS होणे नाही
#बाबासाहेबांच्या प्रत्येक महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला शास्रीय संगितातील सर्वोच्च दर्जाच्या जागतिक प्रतिभावंतांना एकत्र आणून भिमांजली सारखा दर्जेदार आदरांजलीचा कार्यक्रम देणारा असा IAS होणे नाही
# कल्याणच्या बुद्धभुमी फाऊंडेशन येथिल २२ एकर जागेत ४ सत्रात दोन दिवस लाखोंच्या उपस्थितीत दहापेक्षा अधिक देशांतील १०० हुन अधिक भिक्खु संघाला सन्माने आमंत्रीत करून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मंगलमय सोहळा घेणारा असा IAS होणे नाही
# कोरोनाच्या महाभयंकर साथीतही अविरत काम करून १०,००० कुटुबांना महिनाभराचा शिधा नम्रपणे दान करणारा असा IAS होणे नाही
# कोरोनाच्या महाभयंकर साथीत शेकडो ॲाक्सिजन व्हेंटीलेटर दान करणारा व ५० ॲम्ब्युलन्स अर्पण करणारा असा IAS होणे नाही
# कित्येक गरजू रूग्णांनांचे प्राण वाचवणारा , कित्येकांना जिवनावश्यक औषधे मोफत देणारा
असा IAS होणे नाही
# विदर्भ मराठवाड्यात समतापर्वच्या माध्यमातून कित्येक जातीधर्माच्या अनुयांना एकत्र आणून फुले-शिवाजी महाराज शाहू महाराज -डॅा बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती करणारा असा IAS होणे नाही
# औरंगाबादच्या मिलिंद कॅालेजच्या विस्तिर्ण प्रांगणात लाखोंच्या अनुयायींसाठी जागतिक धम्मगुरू दलाई लामांसह शेकडो भिक्खु संघासह महाप्रचंड धम्म मेळावा घेणारा असा IAS होणे नाही
#टायकोटसुट अश्या आधुनिक पोषाखात राहुनही विहारात मात्र सर्व सामांन्यासारखा जमिनीवर बसणारा असा IAS होणे नाही
# आपल्या आईवडीलांवर भाऊबहिणीवर जितके प्रेम करतात त्याच प्रेमाने आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांची मुलामुलींची काळजी घेणारा असा IAS होणे नाही
#सामाजिक तसेच धम्म क्षेत्रात व बाबासाहेबांच्या चळवळीत भरभरून योगदान करतांना आपल्या प्रशासकिय कामातही नेहेमीच अव्वल A + दर्जाचे काम करणारा व प्रशासनाचा गोरगरिब पिडीत कामगार व महिला यांना जास्तित जास्त कसा लाभ होईन हे पाहणारा , असा IAS होणे नाही
# जवळपास दहा हजार तरूणतरूणींनी उद्योग क्षेत्रात यावे म्हणून त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण शिबिर सरकारच्या पैशाने घेणारा व उद्योग धोरणात महिलांना व एसटी एससींना आरक्षण देणारे धोरण आणणारा असा IAS होणे नाही
खरंतर एखादा ग्रंथ होईन एवढे आभाळाइतके काम साहेब तुम्ही आजवर केले आहे. हे फक्त आम्हाला माहित झालेले हिमनगाचे टोक असावे . सध्या इतकेच इथे जागेअभावी लिहीले आहे.
अजूनही खूप काम तुमच्या हातून होणार आहे.

आजच्या या तुमच्या वाढदिवसाच्या मंगल दिनी आपल्या शुभेच्छा देतो व येथेच थांबतो !