तुमच्या मुलाचा स्वभाव समजून घ्या
भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म राजांना शिकवला, भिकान्यांना शिकवला, त्याचप्रमाणे जमीनदार आणि शेतकऱ्यांना, सैनिकांना आणि व्यापान्यांना स्वतंत्र माणसांना आणि गुलामांना, तत्त्वज्ञानींना आणि गणिकांना, राजनर्तकींना सर्वांना शिकवला. समाजाची रचना आणि त्यांच्या देशाची समस्या याची त्यांना संपूर्ण माहिती होती. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य, स्वभाव त्यांना अवगत होते. त्याचप्रमाणे, त्याच पद्धतीने आपण स्वतःच्या मुलांचे स्वभाव व चारित्र्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळेच आपण मुलांना धम्म परिणामकारक पद्धतीने शिकवू शकू. ह्या मुलांनी आपल्या कुटुंबात जन्म घेतला असल्यामुळे जणू काही आपण त्यांचे विश्वस्तच असतो. जरी ते आपल्यापासून वेगळे आणि स्वतंत्र असले तरी त्यांची आपल्यावरच जबाबदारी असते. कोणत्या तरी एखाद्या दैवी शक्तीने आपल्यावर त्यांची जबाबदारी सोपवलेली नसते, तर त्या मुलांनी स्वतःच त्यांची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली असते. त्यांचेशी काही साधर्म्य, समानत्व असल्यामुळेच आपल्या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला असतो. त्यांचे स्वभाव, चारित्र्य समजून घेणे म्हणूनच खरे तर आपल्याला सोपे वाटले पाहिजे आणि बुद्धधम्म शिकवण्यासाठी ते काहीसे अटळही आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या शिकवणीची पुरेशी ओळख मुलांना करून देणे आईवडिलांना फारसे कठीण जाऊ नये आणि या वस्तुस्थितीमुळे बौद्ध आईवडिलांना प्रोत्साहन व उत्तेजन मिळाले पाहिजे. जर आईवडील आपल्या मुलांना बुद्धधम्म शिकवणार नसतील अगर शिकवू शकणार नसतील तर ह्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यात दुसरे कोण यशस्वी होऊ शकणार आहे ? कारण यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे, धम्माच्या अमूल्य देणगीपेक्षा अन्य चांगली देणगी आपण आपल्या मुलांना देऊ शकणार नाही. कारण भगवान बुद्धांनी स्वतःच म्हटले आहे, “सब्बदानम् धम्मदानम् जिनाति” धम्माचे दान इतर सर्व दानापेक्षा श्रेष्ठ असते. ( धम्मपद ३५४ )
भौतिकवादापासून आणि ख्रिस्तधर्मापासून मुक्तता
धम्मप्रकाशासाठी आपल्या मुलांची मने मोकळी असावी, मुलांची मने भौतिकवादाच्या चैनीच्या, उपभोगाच्या जाळ्यात सापडणार नाहीत अगर तथाकथित सर्वशक्तिमान देवाच्या अस्तित्वाच्या विश्वासाभोवती गुरफटणार नाहीत, यासाठी आपल्याला मुलाकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवावे लागेल. खरेतर युरोपियन बौद्धांची मुले सुबत्ता भौतिकवाद आणि ख्रिस्तधर्म या दोन टोकांच्या वातावरणात वाढत असतात, त्यामुळे ख्रिश्चनधर्म आणि बुद्धधम्म यांच्यातील मूलभूत फरक मुलांना विशेषत्वाने समजावून सांगावा लागेल आणि इतर प्रकारच्या तत्त्वज्ञानातील अगर धर्मातील फरकही त्यांना साधारपणे समजावून द्यावा लागेल. या दोन किंवा अनेक धर्माच्या / तत्त्वज्ञानांच्या संदर्भात बुद्धधम्म हा सर्वांचा सुवर्णमध्य कसा आहे हे सांगण्याच्या उद्देशाने धम्माची सर्व वैशिष्ट्ये सांगावी लागतील. त्यामुळे बाह्य प्रभावापासून मुलांची आपण मुक्तता करू शकू पाश्चिमात्य जगतात ख्रिश्चनधर्म आणि भौतिकसंपत्ती ही दोन प्रभावी माध्यमे आहेत त्यापैकी भौतिक संपत्तीबाबतचा मूर्ख युक्तिवाद आपण मुलांना पटवून देऊ शकतो आणि ख्रिश्चनधर्माची जी मूलभूत शिकवण आहे त्याची मुलांना ओळख करून देऊ शकतो. यामध्ये ख्रिश्चन चर्च, ख्रिश्चन संस्कार, विधि आणि समारंभ, चर्चमधील सामुदायिक गान आणि इतर बाबी यांचा यात अंतर्भाव करता येईल. अन्यथा जसजशी मुले वाढत जातील, तसतसे वयात आल्यानंतरच्या त्या काळात अशा गोष्टी त्यांचेवर भीषण प्रचंड परिणाम घडवून आणतील. त्यामुळे त्यांनी आपल्या कल्पनेतून आणि धडपडीतून या सगळ्याचा अर्थ शोधून काढण्यापूर्वी या सर्वांशी त्यांचा आधीच नीटसा परिचय झालेला असणे हे अधिक चांगले आहे. संगीताबद्दल आधीच प्रेम असणाऱ्या वा आकर्षक वाटणाऱ्या ह्या मुलांना ह्या बौद्ध संगीताची लवकर ओळख करून दिली तर पुढच्या वयात चर्च संगीत, सामुदायिक लोकसंगीत ऐकल्यानंतर त्याबद्दल त्यांना मोह पडणार नाही. ह्या अगर अशा अनेक मार्गांनी शाळकरी मुलांच्या मानसिक आणि सामाजिक वातावरणाचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ, जर्मनीमध्ये कौटुंबिक जीवनात ख्रिसमसचे फार मोठे अप्रूप असते. मग ते कुटुंब बिगर ख्रिश्चन असले तरीसुद्धा बौद्ध मुले साहजिक विचारतील, ‘असा मजेचा उत्सव आपल्याकडे का नाही ?” खरे तर ख्रिसमस हा कौटुंबिक सण आहे. ( जुन्या जर्मन यूलप्रमाणे ) वर्षातला सर्वांत लहान दिवस. सूर्य पुन आकाशात अधिकाधिक चढू लागण्याचा तो काळ असतो ( भारतात आपण मकरसंक्रात साजरी करतो आणि सूर्याचे ‘उत्तरायण’ सुरू झाले असे मानतो ) खरे तर जुन्या ‘यूल’ उत्सवाचा ख्रिश्चन धर्माशी कसलाही संबंध नाही वा नसतो. तरीही जर्मनीत अजूनही तो त्याच पद्धतीने व दृष्टीने साजरा केला जातो. ही गोष्ट वा हा दृष्टिकोन आपण बौद्ध मुलांना सांगितला पाहिजे,
स्वतःची जबाबदारी
बुद्धधम्मात ‘स्वत ची जबाबदारी’ ही महत्त्वाची मध्यवर्ती कल्पना असते आणि त्याचे महत्त्व वारवार आपण उसवत राहिले पाहिजे कारण मुलांच्या निरागस, कोन्या अगर निःपक्षपाती मनाला ते चटकन पटेल दर संध्याकाळी इतर मुले जेव्हा त्यांच्या देवाची प्रार्थना करीत असतील, तेव्हा बौद्ध मुलांनी मांडी घालून स्वस्थ ध्यानस्थ बसून काही वेळ घालविला पाहिजे आणि सर्व दिवस आपण केलेल्या चांगल्या अगर बाईट गोष्टींबद्दल कृत्याबद्दल स्मरण केले पाहिजे, त्यांना जर असे आढळले की त्यांना दिलेल्या दीक्षेप्रमाणे त्यांनी विचार केलेला नाही, ते तसे बोलले नाहीत अगर ती कृती त्यांनी केलेली नाही, तर पुढच्या वेळी ह्या सर्व चुका कशा टाळता येतील याचा त्यांनी विचार करावा. जर मुलांना असे दिसले वा आढळले की अशा विचारातील आणि कृतीतील चुका त्यांना टाळता येत नाहीत, तर आईवडिलांनी त्यांना मदत करावी. मग दुसऱ्या दिवशी सुधारणा करण्याच्या वा चांगले करण्याच्या कृतनिश्चयाचे स्मरण करूनच ते आपल्या नवीन दिवसाला सुरुवात करतील. अशा तन्हेने, मुले आपल्या मनाची धारणाशक्ती विकसित करू शकतील व चांगल्या आणि कौशल्यपूर्ण विचारांची, वाणीची आणि कृतीची मशागत करून त्यात शुद्धता आणू शकतील, अशा तन्हेने, अगदी लहान वयातच, ख्रिश्चनांची जी एक समजूत अगर आग्रह असतो की सर्वांना क्षमा करणारा परमेश्वर स्वत अगर त्याच्यातर्फे एखाद्या पाद्र्यामार्फत आपल्या सर्व पापांची शुद्धी करतो, या समजुतीच्या पलीकडे आपली मुले आधीच जातील. धम्मासंबंधीची शिकवण मुलांना इतर कशाहीपेक्षा अधिक चांगल्या तऱ्हेने दाखवून देईल की स्वतच्या प्रत्येक विचारात, शब्दात आणि कृतीत ‘बी’ आणि ‘फळ’ दडलेले असतेच, त्याबाबत आपण एवढेच करू शकतो, की जे काही चूक आहे ते सुधारायचे म्हणजे काय काय करायचे? तर भविष्यात चांगलेच कार्य करायचे आणि पूर्वी आपण ज्या चुका केल्या असतील अगर बाईट गोष्टी केल्या असतील त्या टाळायच्या. पूर्णत स्वतः ची जबाबदारी हे परिपक प्रौढ मनाचे मुख्य लक्षण असते आणि मुले हा सद्गुण आपल्यामध्ये बाणवतील, तेव्हा तो अगदी खात्रीचा आणि सुरक्षित जीवनमार्ग असेल.
याशिवाय आणखी कितीतरी गोष्टींचा आपण बौद्धधम्मीय आईवडिलांनी आपल्या मुलासंबंधाने विचार केला पाहिजे. उदा. जेवणाच्या वेळी त्यांच्या पुढील अत्रासाठी निर्माता अगर परमेश्वराचे ख्रिश्चन मुले आभार मानतात. बौद्ध मुलांनी पण तेव्हा एक विचार केला पाहिजे तो म्हणजे जगात अशी अनेक मुले-माणसे आहेत. की ज्यांना आपल्यासमोरच्या अत्राप्रमाणे अन्न मिळत नसते, ती भुकेली असतात. आपल्यासमोरच्या अन्नाबद्दल, त्याच्या चवीबद्दल त्यांनी अकारण टीका करू नये, तोडे गाडू नयेत. त्यांनी आपल्या आवडीनिवडींची कधीच चर्चा करू नये आणि अन्नाबद्दलचे पूर्वग्रह निर्माण करू नयेत. भिक्खु मंडळी ज्याप्रमाणे त्यांच्या भिक्षापात्रात पडणारे अन्न शांतपणे, चर्चा न करता, पण आनंदाने खातात, त्याचप्रमाणे मुलांनी आपल्या समोरचे, टेबलावरचे ताटातील अत्र मजेने, आवडीने खावे, कारण अन्न केवळ शरीरधारणेसाठी असते. मुले जसजशी वाढत जातील, त्याप्रमाणे आवश्यक अन्नपदार्थांबाबत खाण्यापिण्याची आपली बंधने अगर आवडीनिवडी असू नयेत.
ह्या अगदी छोट्या लेखात बौद्ध शिक्षणाबाबतचा अगदी लहान आराखडा मी देऊ शकलो, खरे तर यातील प्रत्येक विभागावर एक पुस्तिका करावी लागेल. आपल्या मुलांकडे शैक्षणिकदृष्ट्या दुर्लक्ष करण्यात काय धोके आहेत हे बौद्ध आईवडिलांना दाखवून देण्यात मी थोडासा यशस्वी झालो आहे असे मला वाटते. हे जर खरे असेल, तर काही बौद्ध आईवडिलांची अक्षम्य मते यापुढे मला ऐकावी. लागणार नाहीत वा लागू नयेत. कोणती मते ? “आम्ही ज्याप्रमाणे केले, त्याप्रमाणे आमचे मूल आपला धर्म निवडील. त्याबाबत त्यांचेवर दडपण आणणे बरोबर नाही!” मागाहून म्हणजे केव्हा? ख्रिश्चनधर्म आणि भौतिकवाद यांनी आपल्या मुलांवर स्वैर आणि अनिर्बंध प्रभाव पाडल्यावर? मग अशा प्रभावाखाली वाढल्यावर, मुले स्वतंत्रपणे बौद्धिक वा शहाणपणाची निवड खरेच करू शकतील का? आपला मार्ग मुले आपणच शोधून काढतील अशी अपेक्षा करणे योग्य ठरेल का? खरे तर, कोणत्याही बाह्य मदतीशिवाय वा प्रभावाशिवायच बौद्ध मंडळी आपल्या धम्माबद्दल जागरूक असतात. पण अन्य धर्मीय मंडळींना मार्गदर्शनाची आणि बोधपर उपदेशाची आवश्यकता असते, म्हणूनच भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांना उपदेश केला आहे, “हे भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, सर्व जगावरच्या करुणेने सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या लाभासाठी, देव व मानव यांच्या कल्याणासाठी फिरत रहा! हे भिक्खूनों, उद्घोष करा ह्या तेजस्वी शिकवणुकीचा, ह्या -पवित्र, परिपूर्ण आणि विशुद्ध जीवनाचा उपदेश करा. (विनय महावग्ग) आपल्याला हे माहीत आहे की अनभिज्ञ वा अडाणी माणूस भिक्खू असत नाही. पाश्चिमात्य जगात अगदी तुरळक भिक्खू असल्याने सर्वसामान्य माणसेच धम्माचा उद्घोष करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. बौद्ध विचारप्रणालीनुसार आपल्या मुलांवर योग्य प्रभाव पाडण्याचा बौद्ध आईवडिलांना केवळ अधिकार आहे असेच नाही, तर विचारपूर्वक आणि पूर्णपणे पार पाडण्याचे ते एक कर्तव्य आहे. जगातील सर्वोत्तम देणगी म्हणजे धम्माची देणगी होय. ही सर्वोत्तम देणगी आपल्या मुलाकडून निभावून घेण्याचे उत्तरदायित्व बौद्ध आई-वडील स्वीकारतील का ?
सबदानम् धम्मदानम् जिनाति ।
More Stories
‘सम्यक वाचा’ अनुसरा आणि गोड बोला Mindful Communication is Sweet talk
परित्राण पाठ मराठी मध्ये Paritran Path in Marathi
बौद्ध धम्म प्रार्थना खमा याचना ( क्षमा याचना ), पंचसील याचना ( पंचशील याचना ) पाली आणि मराठी भाषेत