August 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

सर्व भारतीयांना बुद्धपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा.

भारतीय उपखंडातील पहिले थोर विचारवंत, ज्यांच्या जन्मामुळे या देशाची भूमी पावन झाली आहे असे, देव-पुनर्जन्म-स्वर्ग-नर्क-आत्मा-कर्मकांड आदि नाकारणारे क्रांतीकारक विचारवंत,ज्यांच्या नावामुळे आजही भारताला बुद्धाचा देश म्हणून जगात आदराने पाहिले जाते असे,आपल्या अनुयायाना कोणत्याही बंधनात न ठेवता आपल्या विचारांची चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य देणारा पहिला आणि शेवटचा धम्म संस्थापक, भार्मिक व अतिरंजित कल्पनावर विसंबून न राहता आपल्या धम्मात एका मानवाचे दुसऱ्या मानवाशी असणारे नाते तसेच मानवी दुःख,दुःखाची कारणे व दुःख निवारण्याचे मार्ग यावर चर्चा करणारा एकमेव धम्म संस्थापक, ज्यांच्या बदल बोलतांना स्वामी विवेकानंद म्हणतात की, बुद्धाचा एक अंश जरी माझ्यात राहिला असता तर मी स्वतःला धन्य समजलो असतो तर थोर विचारवंत ओशो म्हणतात की, जगाला व भारताला बुद्धा सारखा महामानव पुन्हा जन्माला घालता आला नाही हे सगळयांत मोठे दुर्दैव,असे विश्वदिप, महाकारुणिक, तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या अर्थात बुद्धपूर्णिमेच्या समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…..💐💐💐💐💐