June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

६ डिसेंबर , २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना . परिपत्रक

६ डिसेंबर , २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना . परिपत्रक

मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ” ओमिक्रॉन ” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे . मुंबईमध्ये / महाराष्ट्रामध्येही ओमिक्रॉन प्रजातीची काही प्रकरणे आढळून आलेली असल्याने या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे . या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम , जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे . ६ वरील पार्श्वभूमीवर या संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता , यावर्षी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक ६ डिसेंबर , २०२१ रोजी परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी , दादर , मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत खालीलप्रमाणे • मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत :

१. यावर्षी परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा दिनांक ०६ डिसेंबर , २०२१ रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड १ ९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे .

२ . कोविड १ ९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसुल व वन , आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक परिपत्रक क्र . DMU / २०२० / CR . ९ २ / DisM- १ / , दि .०४.०६.२०२१ , सार्वजनिक आरोग्य विभागाचे आदेश क्र . कोरोना -२०२१ / प्र.क्र .३६६ / आ -५ , दि . ११.०८.२०२१ तसेच आदेश क्र.कोरोना -२०२१ / प्र.क्र .३६६ / आ -५ , दि . २४.० ९ .२०२१ अन्वये ” ब्रेक द चेन ” अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे .

३ . महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दुःखाचा गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे . त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे . तसेच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी , दादर , मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी , दादर , मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे .

४ . चैत्यभूमी , दादर , मुंबई येथे परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत . सदर कार्यक्रमासाठी जे व्यक्ती परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेले असणे बंधनकारक राहील . तसेच औष्णिक पटेक्षण ( Thermal Screening ) च्या तपासणीअंती ज्यांचे शरीराचे तापमान सर्वसाधारण असेल त्यांनाच सदर कार्यक्रमास उपस्थित रहाण्यासाठी परवानगी देण्यात येईल . कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर , सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे , जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही .

५. दिनांक ०६ डिसेंबर , २०२१ रोजीच्या परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क मैदान परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत . तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा , धरणे , निदर्शने , आंदोलने व मोर्चे काढू नयेत .

” महापरिनिर्वाण दिनानिमित्त परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम हा राज्यातील सर्व जिल्हे तालुके यामध्येही आयोजित करण्यात येत असल्याने त्यासंदर्भात स्थानिक / जिल्हा प्रशासनाने कोविड १ ९ च्या स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक ते सनियंत्रण व उपाययोजना कराव्यात व त्यासंबंधीचे आदेश काढावेत .

19 . कोविड- १ ९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग , मदत व पुनर्वसन विभाग , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महापरिनिर्वाण दिन अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरुन आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे . सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२१११३०११२१०२४९२९ असा आहे

 

६ डिसेंबर , २०२१ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना . परिपत्रक 

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202111301121024929….pdf

 

38 गृह विभाग 6 डिसेंबर, 2021 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना. 202111301121024929… 30-11-2021 1115

https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions