May 14, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मालेगाव : भव्य श्रामणेर शिबीर आयोजन Grand Shramner Shibir Event

भारतीय बौध्द महासभा नाशिक जिल्हा अंतर्गत मालेगाव शहर शाखा अध्यक्ष मा.दिलीप शेजवळ गुरुजी आणि पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने भव्य श्रामणेर शिबीर दि.१४/०५/२०२२४ ते २३/०५/२०२४ दहा दिवस शिबीर आयोजन करण्यात आले होते सदर शिबीर आय.एम.ए हॉल मालेगाव कॅम्प येथे दहा दिवस भदन्त शीलरत्नजी थेरो भदन्त विमलकिर्तीजी थेरो भदन्त बोधिपालजी भदन्त करुणानंदजी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले

श्रामणेर शिबीर प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व नाशिक जिल्हा अध्यक्ष आद.के.के.बच्छाव गुरुजी यांनी सदर संघास भेट दिली असता शाखेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मालेगाव शहर शाखेची कालमर्यादा दोन वर्षांकरिता वाढवून देण्यात आली प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य संस्कार प्रमुख मा.वाय.डी.लोखंडे गुरुजी, नाशिक जिल्हा अ.महासचिव पी.डी.खरे गुरुजी मालेगाव ता.अध्यक्ष मा.संदिप गायकवाड गुरुजी, बागलाण तालुका अध्यक्ष मा.वनीस गुरुजी यांच्या उपस्थितीत शाखा मान्यतापत्र देण्यात आले मा.बच्छाव गुरुजी यांनी श्रामणेर संघास वंदन करून शुभेच्छा दिल्या व भावी आदर्श बौध्दाचार्य धम्म प्रचारक बनुन संस्था बळकट कराल अशी अपेक्षा व्यक्त केली