आमरण उपोषण दि. १२ सप्टेंबर २०२३ पासून स्थळ : उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या गेट शेजारी (डीसीपी ऑफिस जवळ, वायले नगर, खडकपाडा, कल्याण (प.) रेल्वे जमीन अधिग्रहणाच्या मोबदल्यातून बुध्दभूमी फाऊंडेशन कल्याण येथे शाळा, हॉस्पिटल, स्मारक व महाबोधी महाविहार प्रतिकृती बांधून मिळण्यासाठी आदरणीय भन्ते ब्रह्मरत्न (वय वर्षे ६५) यांचे आमरण उपोषण…
बुध्दभूमी फाऊंडेशन, कल्याण तर्फे आपल्याला कळकळीची विनंती करण्यात येत आहे की, बुध्दभूमी फाऊंडेशनच्या ताबा-हक्क व कब्जे वहिवाटीतील ३१ गुंठे जागा रेल्वे प्रकल्पबाधित झालेली आहे. परंतु या रेल्वे प्रकल्प बाधित जागेचा कबूल केलेला हक्काचा मोबदला आम्हाला अजून पर्यंत मिळालेला नाही. याउलट काही जातीयवादी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांना संगनमत करून आमचा हक्काचा मोबदला हडप करण्याचा डाव रचलेला आहे. या अन्यायाविरूध्द पूज्य भन्तेजी ब्रह्मरत्न यांनी दि. १२/०९/२०२३ रोजी आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे. बुध्दभूमी फाऊंडेशनचा प्रत्यक्ष ताबा हक्क व वहिवाट आम्ही वेळोवेळी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील आम्हाला जाणून बुजून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. फाऊंडेशनचे वहिवाट, ताबा हक्क व पिक पेरा नोंदीची कागदपत्रे वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे. असे असूनही काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी बोगस व खोट्या कागदपत्रांच्या आधारे बुध्दभूमी फाऊंडेशनचा रेल्वे बोर्डाकडून मिळणारा हक्काचा मोबदला हिरावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात निर्णयाधीन असताना देखील रेल्वे व स्थानिक प्रशासन यांनी दडपशाही व दंडेलशाहीच्या जोरावर वरील जागा बेकायदेशीरपणे कब्जा करू पाहत आहे. आपल्याला कल्पना असेलच की, बुध्दभूमी फाऊंडेशन येथे सर्व बहुजन पक्ष, संघटना यांचे विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम वर्षभर चालू असतात. आझाद मैदान, मुंबई येथे सलग ५२ दिवस चाललेले बार्टीच्या ८६१ पिएच.डी. फेलोशिप विद्यार्थी आंदोलनाचे बुध्दभूमी फाऊंडेशन मुख्य आधार केंद्र होते. तरी तमाम आंबेडकरवादी जनतेला आवाहन आहे की, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा आप-आपल्या परीने जाहीर निषेध करावा आणि या उपोषणास समर्थक द्यावे. कल्याण, ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील समविचारी संघटनांनी आणि धम्म बांधवांनी पूज्य भंतेजींच्या या आमरण उपोषणात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने वि. १२/०९/२०२३ रोजी दुपारी २ वाजता उपविभागीय प्रांत अधिकारी कार्यालय, वायले नगर, कल्याण (प.) येथे उपस्थित रहावे. • प्रमुख मागण्या • १) बुध्दभूमी फाउंडेशनच्या ताबा हक्क व कब्जे वहिवाटीतील ३१ गुंठे जागेचे रेल्वे अधिग्रहण नुकसान भरपाईतून बुध्दभूमी फाउंडेशनच्या जागेत शाळा, हॉस्पिटल, स्मारक व महाबोधी महाविहार बांधून मिळणे. २) बौध्द धम्मगुरु व भिक्खुगण यांचे अपमान व धार्मिक प्रतिकांची नासधुस, विटंबना करुन नुकसान करणारे प्रांत अधिकारी श्री. अभिजीत भांडे पाटील, क. डों.म.पा. आयुक्त भाऊसाहेब दांगडे, नायब तहसिलदार सुषमा बांगर, क. डॉ.म.पा. अधिकारी भाणाजी भांगरे, सुनील पाटील, सविता हिले, मध्य रेल्वे अधिकारी राजेंद्र कुमार, मोहम्मद एजाज नायर, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, मोजणी अधिकारी डी.डी. कानोज, श्रुती तरे यांच्यावर बुध्दभूमी फाऊंडेशनने दिलेल्या तक्रारी प्रमाणे कारवाई व्हावी. ३) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अ. प्र.) सुधारणा अधिनियम २०१५ नुसार अत्याचार ग्रस्त व्यक्तीस मिळणारे आर्थिक सहाय्य महाराष्ट्र शासनाकडून मिळत नसल्यामुळे…
४) बुध्दभूमी फाऊंडेशनच्या वहिवाटीतील जागेचे टायटल फाऊंडेशनच्या नावे नियमित करून सदर भूमीला ‘आंतरराष्ट्रीय बौध्द पर्यटन स्थळ’ जाहीर करून या ठिकाणी शासनातर्फे ₹५०० कोटीचे ‘इंटरनॅशनल बुध्दिस्ट थीम पार्क’ निर्माण करुन देणे.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?