November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

फाल्गुन पौर्णिमा – बौद्धांचा सण आहे

फाल्गुन पौर्णिमा :  पौर्णिमेस नागलोकांचा राजपुरुष मारला आणि तो नाग लोकांच्या घरासमोर जाळला.. नाग लोकांचा खूप छळ केला, त्रास दिला, मारहाण जाळपोळ केली. तेव्हा नाग लोकांना जबरदस्तीने या दुःखाच्या दिवशी सण करण्यास भाग पाडले. या हुकुमशाहीने नागांना ते करणे भाग पाडले. या दिवशी होळी करून पेटवीतात. याचा अर्थ नागांच्या पूर्वजाची ती चिता आहे. आताही हिंदूची तीच प्रथा आहे. मनुष्य मृत्यू झाल्यास ते लोक प्रेताला चार माणसे खांदे देतात आणि घरातील कर्ता जो मुनष्य असेल त्याला शिकाळी धरण्यास लावतात. प्रेताला अग्नी दिला की, शिकाळी धरणारा मनुष्य स्नान करून शिकाळीचे मडके पाण्याने भरून खांद्यावर घेऊन प्रेताला पाच प्रदक्षिणा करतो, तेव्हा एक मनुष्य हातातील दगडाने त्या मडक्याला मारून छेद पाडतात. शेवटी मडके टाकून देताच बोंब मारण्यास सांगतात. त्याप्रमाणे होळीला पण तांब्या पाण्याने भरून पेटलेल्या होळीला नैवैद्य, हळद कुंकू वगैरे दाखवून पाणी ओतीत पाच प्रदक्षिणा करतात. शेवटी बॉब मारतात. हा जो प्रकार आहे तो नागांच्या पूर्वजाला जिवंत जाळल्याचा आहे. नागयज्ञ करून नागलोकांना त्यात जिवंत जाळले होते. त्यास नागयज्ञ म्हणतात. म्हणून बौद्ध लोकांनी होळी करू नये. पौर्णिमेचे अष्टशील ग्रहण करून शिलाचे पालन करावे. सर्व लहान थोर मंडळी एकत्र येऊन वंदना करावी. धम्मप्रवचन ऐकावे. अशा प्रकरे होळीचा दिन साजरा करावा. मद्यपान सेवन करू नये. बौद्ध धम्माच्या विरुद्ध आचरण करणे धम्माचा घोर अपमान आहे. प्रत्येक महिन्याची पौर्णिमा बौद्धांचा सण आहे.

बारा पौर्णिमा, बारा अमावस्या, चोवीस अष्टमी, बुद्ध जयंती, भीम जयंती, विजयादशमी, नागपंचमी, नागदिवाळी हे बौद्धांचे खरे सण आहेत. यापेक्षा बौद्ध लोकांनी हिंदूचे कोणतेही सण करू नये.

फाल्गुन पौर्णिमेला शीघ्रही भगवान बुद्धाने आपला पिता शुद्धोधन आणि सिमांत जनांच्या अनुकंपार्थ कपिलवस्तुला घेऊन येण्यासाठी बालमित्र कालुदायी गेला होता. कालुनायीनी याचना केल्यावर भगवान फाल्गुन पौर्णिमेला कपिलवस्तु नगरीला आले आणि शांतीदूत विश्ववंदनीय भ. बुद्धानी न्यग्रोधारामध्ये निवास केला, राहूल, नंदाची प्रव्रज्या याचवेळी झाली महाप्रजापति गौतमीने दुशाला जोडी-दान दिली. यानंतर ते तेथून निघून गेले. अशाप्रकारे बौद्ध लोकांनी या पौर्णिमेचे महत्व स्मरणात ठेवावे महान पौर्णिमेचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा करावा. सर्वजन एकत्रित येऊन हा सण साजरा केला पाहिजे.