December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

निवडणुका नि:पक्षपाती होण्याची गरज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रविवार दिनांक २३ डिसेंबर १९५१ रोजी समाजवादी पक्ष व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन याच्या वतीने मुंबई येथील चौपाटीवर सभा आयोजित करण्यात आली या समेत पाच लाखापेक्षा जास्त स्त्री-पुरूषाचा विराट समुदाय हजर होता या सभेस उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

निवडणूक विषयीचा कायदा पास झाल्यावर शुद्ध, स्वतंत्र व पद्धतशीर निवडणुका होण्यासाठी वर्ष दोन वर्षाचा अवधी हवा होता.

निवडणुकाबाबतचा कायदा मंजूर झाल्यावर एकदोन वर्षात निवडणुका केल्या असत्या तर कॉंग्रेसखेरीज इतर पक्षांना एक प्रबळ कॉंग्रेसविरोधी पक्ष संघटित करण्यास अवसर मिळाला असता.

१९४६ पासून कॉंग्रेसपाशी अनियंत्रित सत्ता असतानाही कॉंग्रेस सरकार लोकाचे कोणत्याही प्रकारचे कल्याण का करू शकले नाही या माझ्या सवालाचे नेहरूंनी उत्तर द्यावे येत्या ५ वर्षात काँग्रेस काय करणार याचेही उत्तर त्यानी द्यावे. नेहरूच्या भाषणात याचे उत्तर मिळत नाही. त्यात नुसता शिवराळपणा असतो. विधायक दृष्टी नसते !

तुरुंगात जाऊन अगर लढा करून कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवले हा भ्रमाचा भोपळा आहे. सुभाषचंद्र बोस हेच स्वातंत्र्य मिळविण्यास मुख्यतः कारणीभूत झाले हिंदी सैन्याच्या निष्ठेवर ब्रिटिश सरकार आधारले होते. बोस यानी त्या निष्ठेला पराकाष्ठेचा धक्का देऊन सैन्यात असंतोष फैलावला आणि आझाद हिंद सेना स्थापिली. हे पाहून ब्रिटिशांनी काढता पाय घेतला.

कॉंग्रेसची १९४२ ची चळवळ अयशस्वी ठरली. सुरु केलीच नव्हती असे गांधी म्हणाले होते याचा काँग्रेसवाल्यांना विसर पडला

१९४२ ची चळवळ मी कधी आहे ही चळवळ फसली याचा एक पुरावा म्हणजे त्यानंतर गांधींनी कॅव्हेलची मुलाखत मागितली असता वॅव्हेलने त्यांना स्पष्ट नकार दिला. १९२१ पासून कोणत्याही व्हाइसरॉयने गांधीचा असा अपमान केला नसावा.

समाजवादी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन या समझोत्यावरील वृत्तपत्रांची टीका मी बारकाईने वाचली पण त्यात काही तथ्य सापडले नाही या दोन पक्षाच्या जाहीरनाम्यात एकही दोष दाखवण्याची कोणाचीही छाती झाली नाही. काँग्रेसला यश मिळू नये म्हणून समाजवादी व शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन यांनी एकमेकाना सहाय्य करण्याचे ठरविले आहे. अर्थात काही प्रश्नाबाबत आमचे मतभेद आहेत. स्वतंत्र उमेदवार माझ्याकडे आले असते तर मी त्यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला असता. पण आता कोणीही स्वतंत्र उमेदवारांना मते देऊ नयेत.

समाजवादी- शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन येत्या फेब्रुवारीत मुंबई कार्पोरेशन काबीज करून मुंबई एक नवे शहर बनवतील असा विश्वास श्री अशोक मेहता यांनी प्रथम बोलताना व्यक्त केला. नेहरू ही समाजवाद्यांच्या मार्गातील एक धोंड असल्याचे मत त्यांनी प्रगट केले. श्री पुरुषोतम त्रिकमदास व कृष्णा हाथीसिंग यांचीही भाषणे झाली,

🔹🔹🔹🔹
✍🏻 आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे

Elections need to be impartial – Dr. Babasaheb Ambedkar