September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

त्रिरश्मी बुद्ध लेणी यथे धंमलिपि व शिल्पकला कार्यशाळा संपन्न

नाशिक – प्राचीन भारताचा तसेच नाशिकचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी आज मुंबईसह नाशिक मधील विद्यार्थ्यांनी नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणींवर हजेरी लावली होती, हातात  वही व पेन घेऊन 12 वर्षाच्या मुलापासून ते 65 वयाच्या वृद्धांपर्यंत लेणीप्रेमी तसेच लेणी अभ्यासकांनी सुमारे तासभर धंमलिपि वर्गात धंमलिपीचे धडे गिरवले व शिलालेख वाचन देखील करून दाखवले,
सातवाहन राज्यांचा गौरवशाली इतिहासाला उजाळणी देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर बुद्ध लेणींची जनजागृती होण्यासाठी
MBCPR टीमने ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते,
नाशिकच्या त्रिरश्मी बुध्द लेणींवर कशाप्रकारे जैन पंथीयांनी तसेच महायानी पंथानी थेरवादी परंपरेच्या मूळ शिल्पकलेत कसे बदल केले व अतिक्रमणे कशी होतात हे शिल्पकलेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना दाखवून दिले,
लेणी क्रमांक १ पासून ते लेणी क्रमांक २५ पर्यंत तसेच नव्याने संशोधन केलेल्या लेणी समूहाला देखील विद्यार्थ्यांनी भेट देऊन संपूर्ण इतिहास ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून जाणून घेतला,
लेणी क्रमांक १९ व लेणी क्रमांक २० मध्ये नाशिकचे नाव २२०० वर्षांपूर्वी देखील नाशिक होते हे शिलालेखांच्या अभ्यासातुन विद्यार्थ्यांना दाखवून देण्यात आले,
प्राचीन बुद्ध लेणी ह्या संपूर्ण भारताचा वारसा असून त्याचे संवर्धन व जतन करणे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे असे
प्रतिपादन लेणी अभ्यासक लिपि तज्ञ सुनील खरे यांनी ह्या कार्यशाळे वेळी केले,
संतोष वाघमारे यांनी चैत्यस्तुपाची माहिती दिली, प्रवीण जाधव यांनी बुद्ध रुपा बद्दल असलेले समज गैरसमज प्रबोधनातून दूर केले
गुजरातमध्ये असलेले भारूकच्छ शहर , गोवर्धन गाव, नाशिक शहर, सीरिया मधील डामचीक शहर व सध्याचे डमॅकस शहर येथील व्यापाऱ्यांनी देखील बुद्ध धंम स्वीकारलेला होता व त्यांनी २५ क्रमांक मधील पाण्याच्या पोढी साठी धंम दान दिल्याचा उल्लेख येथील शिलालेखात केलेला आहे हे इथं आपल्याला बघायला मिळतो,
हत्तीवरून आरूढ होऊन दोन्ही हात जोडून जनतेला नमस्कार करणारी महिला ही बुद्ध काळात राणी होती हे ह्या शिल्पातून दिसते व स्रियांना त्या काळात देखील किती समानतेचे स्थान होते ह्या लेणी अभ्यासताना आपल्याला दिसून येते,
ह्या कार्यशाळेत डॉ विशाल जाधव, अमरकुमार साळवे, हेमंत तपासे, अनंत डावरे, दत्तू इंगळे, डॉ रचना ऊराडे, आकाश खरे, सतीश सरदार, सुरेश कांबळे, Santosh Kalpana Vasant , सोनाली निसर्गन, विजया तेजाळे, बाळासाहेब साळवे, रवींद्र आढाव, Aki Hajare , Akash Bhalerao सिद्धार्थ अहिरे , शिवदास दोंदे , राहुल खरे रितेश सुभाष गांगुर्डे ,
इत्यादी धंम लिपि अभ्यासक उपस्थित होते.
✍️सुनील उषा खरे
महाराष्ट्र बुद्ध लेणी संवर्धन व संशोधन समुह