February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त १०० फूट लांब धम्मध्वजाची भव्य गौरव रॅली.

आपला धम्म.. आपला ध्वज.. आपला अभिमान..!

विश्व बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त औरंगाबाद शहरात १०० फूट लांब धम्मध्वजाची भव्य गौरव रॅली.

धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण जगातील बौध्दांचे एकच प्रतीक असावे, या विचाराने सन १८८०  मध्ये श्रीलंकेचे अनागारिक देवमित्र धम्मपाल, महास्थविर गुणानंद, सुमंगल, बौध्द विव्दान जी. आर. डिसिल्वा इत्यादिनी मिळून निळा, पिवळा, लाल, पांढरा व केसटी अशा पाच रंगाच्या उभ्या व आडव्या पट्ट्यामध्ये ‘विश्व बौध्द ध्वजा ‘ ची निर्मिती केली आहे.

जागतिक पटलावर बौद्धांच्या अस्मितेच्या ह्या धम्मध्वजाच्या गौरवार्थ १०० फुटी बौद्धधम्म ध्वजाच्या गौरव रॅलीत सर्व धम्म उपसकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

रविवार दि.०८ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता

रॅलीचा मार्ग : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते धम्मभूमी बौद्धलेणी, औरंगाबाद.

औरंगाबाद शहरातील सर्व बौद्ध उपासक, उपासिका, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

विनीत– सचिन निकम मोबाइल नंबर : ९२७००४९४५८, गुणरत्न सोनवणे, अविनाश कांबळे, अतुल कांबळे

आयोजक – मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र