November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

चक्रवर्ती सम्राट अशोकाचे धम्माआचरण आणि आदर्श राज्यकारभार

सम्राट अशोकाचा जन्म , मौर्य वंशाचे प्रथम सम्राट चंद्रगुप्त यांचे पुत्र सम्राट बिंदूसार यांच्या पोटी इ.स. पूर्व ३०४ साली झाला . यामुळे वंश पारंपारिकतेच्या दृष्टिने सम्राट अशोकाला अफाट साम्राज्य हस्तगत झाले . सम्राट चंद्रगुप्त आणि सिरियाचा सम्राट सेल्युकस या दोघामध्ये झालेल्या कराराबद्दल विवरणात , ‘ अलीहिस्ट्री ऑफ इंडिया ‘ ग्रंथाचे लेखक व्हिन्सेंट ए स्मिथ यांनी लिहिले आहे की , ” सेल्युकस व चंद्रगुप्त मौर्य यांच्यात जो करार झाला त्यामुळे भारताला शास्त्रशुद्ध अशी सरहद , प्राप्त झाली आणि ही सरहद २३०० वर्षापूर्वी एका भारतीय सम्राटाने प्राप्त केली
  सम्राट अशोकाजवळ एवढे साम्राज्य असूनही , सम्राट चंद्रगुप्त आणि सम्राट बिंदुसार यांना भारतातीलच काही राज्ये जी त्यांना घेता आली नाही व सम्राट अशोकाच्या वेळीही ती राजे स्वतंत्र्य होती अश्या भारतातील राज्याकडे सम्राट अशोकाने आपले लक्ष्य केन्द्रित केले.

इ.स. पूर्व २६१ साली त्याने कलिंग विजय प्राप्त केला . काश्मीर अशोकाच्या सम्राज्याचा प्रदेश होता . श्रीनगर हे शहर त्यांनीच वसविले . अशोक तक्षशिलेला कुमारामात्य पदावर असतांना तो प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्याला जोडला होता . याशिवाय ब्रम्हदेश , नेपाल आणि आटविक – आटविक म्हणजे मध्यभारतातील जंगली प्रदेशाचा भाग ब्रम्हदेश व नेपाल येथे त्याचे मैत्रीचे घनिष्ट संबंध होते . कारण येथे सदधम्म प्रचारार्थ अशोकाने आपले धर्मप्रचारक पाठविले होते . मौर्य सम्राट अशोक इ.स. पूर्व २७३ ते २३२ पावेतो तब्बल चाळीस वर्षे विस्तृत साम्राज्याचा स्वामी होता . वायव्येला अफगाणिस्थानच्या सिमेपासून ते आग्नेयास ओरिसापर्यंत व उत्तरेस हिमालय ते दक्षिणेला म्हैसूरपर्यंत पसरले होते . अशोकाची राजधानी पाटलीपुत्र होती व तेथून ते आपला राज्यकारभार पाहात होते .
आधुनिक विहार राज्यातील मगध राज्यात असलेले पाटलीपुत्र नगर निसर्गरम्य अशा स्थळी स्थापन केलेले आहे . सोन नदी आणि गंगा नदिच्या संगमा शेजारी बसलेले पाटलीपुत्र नगरीचे प्राचीन नांव पुष्पपूर , पुष्पा हवय , कुसुमपूर , पाटलीग्राम इ . आहेत.
सम्राट अशोकांनी आपल्या साम्राज्याच्या कारकिर्दीत सदधम्मविचार आणि राजकारण यांची अद्भुत सांगळ घातली . यामुळे सम्राट चंद्रगुप्त आणि सम्राट बिंदूसार यांच्या राज्यकारभारापेक्षा सम्राट अशोकानी आपल्या राज्यकारभारात वेगळाच बदल घडवून आणला व सदधम्म आणि राजकारण समातर दृष्टया राज्य दृष्टया राज्य एवढे बलाढ्य केले की , सम्राट अशोकाचा इतिहास आपणास त्याच्या ३५ ३६ शिलालेखहरे समजून घेता येई अशोकाच्या शिलालेखाची वर्गवारी खालीलप्रमाणे होईल.
१ ) चतुर्दश शिलालेख , २ ) सप्तस्तंभ लेख , ३ ) दोन कलिंग शिलालेख,  ४ ) दोन दुय्यम शिलालेखमा शिलालेख , ५ ) इतर दुय्यम स्तंभलेख ६ ) गुहालेख.
चतुर्दश शिलालेख गिरनार ( महाराष्ट्र ) येथील शिलाखंडावर ईशान्य दिशेला आहे . कालसी , उत्तरप्रदेशातील देशहरादून विभागात , धौली हे ओरिसा प्रांतातील पुरी भुवनेश्वरपासून ६ मैल अंतरावर दक्षिणेस आहे . जोगढ हे ओरिसा प्रांतातील जिल्ह्यातील प्राचीन खेपिंगल पर्वतावर आहे . शाहबाजगढी हे पश्चिम पाकिस्थानात पेशावर जिल्ह्यातील युसूफजाई नावाच्या उपविभागात आहे . मानसेहरा हे पश्चिम पाकिस्थानात आहे . त्यांच्या साम्राज्याच्या उत्तरेस , ईशान्य व वायव्येस नेपाल , टेहरी , गढवाल , पंजाब संपूर्ण वायव्य प्रांत याचा समावेश होत असे . कारण तुम्बीनी , कालसी , शाहबानगढ़ी आणि मानसेहरा येथील शिलालेखावरून दिसून येते . पश्चिमेकडे अरबी समुद्रापर्यंत त्याची दक्षिण सिमा दिसून येते . यवन कम्बोज व गांधारचा प्रदेश त्याचा वायव्य सिमाप्रांत दर्शवितात .
हा प्रदेश कुमाव सिंधू नदीमधील प्रदेश आहे . महावंशात योन देशातील प्रमुख नगराचे नांव अलसंद दिले आहे . ते काबूलच्या सिकंदरिया व अलेक्झांडरिया आहे असे संशोधक मानतात . दक्षिण भागात मद्रासच्या कर्नल जिल्ह्यातील येरागुडी येथे आढळलेल्या शिलालेखावरून त्याचा प्रदेश मद्रासपर्यंत होता हे निश्चित ठरते . तसेच पुरी जिल्ह्यातील धौली व गंजाम जिल्ह्यात जोगड येथील शिलालेखावरुन दक्षिण व नैऋत्य सिमा कळून येते . म्हैसूरच्या चितलदूर्ग जिल्ह्यात मिळालेल्या लघु शिलालेखावरून उत्तर म्हैसूर प्रदेश अशोकाच्या दक्षिण सिमेकडिल प्रदेश होता हे सिद्ध होते . त्याच्या साम्राज्याच्या सिमेवर असलेल्या देशाचा उल्लेख जसे यवन , कम्बोज , गांधार , भोजक , पितनिक , आंध्र , नामक , नाथपंक्ति व परिन्दक ह्याचा उल्लेख शिलालेखावरून होतो . टोपरा हे पूर्व पंजाबच्या अंबाला जिल्ह्यात आहे . फिरोजशहा तुघलक यांनी शिलालेख चवदाव्या शताब्दीत दिल्लीस घेऊन आला . तसेच मेरठ येथील शिलालेख देखील तुगलक यांनी दिल्लीस आणला आहे . इलाहाबाद येथे असलेला शिलालेख एका राजाने कोशाम्बी येथून ( आधुनिक कोसम ) आणलेला आहे . ( इलाहाबाद येथील किल्ल्यात शिलालेख सुरक्षित आहे ) रघिया – लोरिया अरराज , उत्तर बिहार राज्यातील चंपारन जिल्ह्यात वसलेले आहे . लघु शिलालेख प्रथम व द्वितीय सहसराम , दक्षिण बिहारच्या शाहाबाद जिल्ह्यात आहे . रूपनाथ मध्यप्रदेशाच्या जबलपूर जिल्ह्यात बैराट राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात , गुर्जारा मध्यप्रदेशाच्या दतिया जिल्ह्यात ब्रम्हगिरी उत्तर म्हैसूरच्या चितलदूर्ग जिल्ह्यात , मास्की हे रायपूर जिल्ह्यात ( आंध्रप्रदेश ) एरागुडी आंध्रप्रदेशाच्या कुर्नूल जिल्ह्यातील पतीकोड जवळील एका शिलाखंडावर कोरलेला आहे . यावरून त्याचे राज्य किती दूरपर्यंत पसरलेले होते याचा स्पष्ट बोध होतो .

भाब्रू – भाब्रा शिलालेख बैराट जवळील एका शिलाखंडावर कोरलेला आहे . म्हणून याला द्वितीय बैराट शिलालेख देखील म्हणतात . भाब्रा हे स्थळ राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यात आहे .

चार लघुस्तंभ लेख सारनाथ , कोशाम्बी , सांची आणि राणीचा स्तंभलेख आहेत . सारनाथ यालाच प्राचीन काळी ऋषीपतन मृगदान किंवा मृगदाय , डियरपार्क असे म्हणतात . है उत्तरप्रदेशात बनारसच्या उत्तरेला अंदाजे तीन चार मैल अंतरावर आहे . कोशाम्बी है इलाहाबाद जिल्ह्यात आहे . सांची मध्यप्रदेशात भोपाळ पासून अंदाजे ४० मैल अंतरावर जगविख्यात स्तूपाच्या दक्षिण द्वाराजवळ आहे . राणीचा स्तंभलेख कोशाम्बी येथे सापडला होता .
तो आता इलाहाबाद जिल्ह्यात सुरक्षित आहे .
रूम्मिनदेइ , बस्ती जिल्हा मुखपाल्यापासून नेपालच्या तराईत पदरिआ व भगवानपूर गावाच्या उत्तरेला आहे . या शिलालेखावरून भगवान बुद्धाच्या लुम्बीनी बनाची आठवण होते . येथेच गौतम सिद्धार्थाचा जन्म झाला . येथे सम्राट अशोकाचा स्तंभलेख मिळाला आहे . निगलीव येथे देखील अशोकांचा एक स्तंभलेख सापडला आहे .
दक्षिण बिहारच्या गयापासून काही मैल अंतरावर बराबर पाहाडीत अशोकाचे गुफालेख मिळाले आहेत . यालाच बराबर लोभशऋषिगुफा खलतिक व गोरथगिरी म्हणतात . याशिवाय १९२६ , १९३९ , १९५३ , १९५४ च्या उत्खननात आणखी काही अशोकाचे लेख सापडले आहेत . त्यात एररागुडी ( लघुलेख प्रथम व शिलालेख १ ते १३ पर्यंत ) रायपूर येथील लघुशिलालेख प्रथम राजुल व गुर्जरा लेख आहे .

याशिवाय अरामिक अक्षरात कोरलेला अशोकाचा लेख अफगाणिस्थान पुल आईदरुन्त व लघमान जवळील उत्खननात सापडला . लघमान काबूल नदिच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले आहे .

हा लेख डब्लू . बी . हेनींग यांनी याला अरामेक लेख असे संबोधले आहे . सरजान मार्शल यांना तक्षशिला येथील उत्खननात एक अरामेक अक्षरातील लेख सापडला आहे . हा अशोकाचा लेख आहे . हा भारतात सापडलेला पहिला अरामेक अक्षरातील लेख आहे . असे संबोधतात .

आटविक म्हणजे मध्यभारतातील जंगली प्रदेशाचा भाग म्हणता येईल . कालसी येथील शिलालेख याचा पुरावा आहे . कुमायु प्रदेश अशोकाच्या सम्राज्याचा भाग होता . ललीतपाटण येथील ऐतिहासिक अवशेष याचा पुरावा आहे . अशोकाच्या साम्राज्याच्या सिमेची माहिती त्यांच्या द्वितीय , पांचवा , तेराव्या अभिलेखावरुन मिळते . चोड , पांड्य , सत्यपुत्र , केरळपुत्र , ताम्रपर्णी हे स्वतंत्र राज्य , अन्तिथोक नावाचा योन राजा व त्याच्या शेजारी राजाच्या प्रदेशात पशु व मनुष्यासाठी चिकित्सालये स्थापन केली होती . पाचव्या शिलालेखावरून धर्ममहामात्र यांना धर्माची स्थापना , धर्माची उन्नती व धर्मानुयायी लोकांचे कल्याण व सुखासमृद्धीसाठी योन , कम्बोज , गांधार , राष्ट्रीय , पितीनीक व इतरासाठी नियुक्त केले होते .
अशोकाच्या अभिलेखावरून भौगोलिक ज्ञान प्राप्त होते . आपल्या – शिलालेखात अशोक म्हणतात की , धर्म विजय हाच प्रमुख विजय आहे .

आणि देवतांना प्रिय असलेल्या राजा अशोकना येथे ( साम्राज्यात ) सर्व इतरत्र ६०० योजनापर्यंत जिथे अन्तिओक नामक योन राजा आहे व त्या अन्तियोकाची चार राजे आहेत , जसे तुरमयमानक अन्तकीन मक व अलिकसुन्दर तसेच खाली चोल , पांड्य, ताम्रपर्णी राज्यापर्यंत योन कम्बोज , नामक , नाभपन्ती , आंध्र व पुलिद या देशात विजय मिळविला आहे .

अशोकाचे भारतात व भारताबाहेरच्या मित्र राष्ट्रासोबत मैत्रीचे संबंध होते. वरील लेखात विदेशी सम्राटात सिरिया , मिस्त्र , मकदुनिया व एपिरसचे युनानी शासक यांचा उल्लेख आहे . आपल्या पूर्वीच्या नरेशानी जसे मैत्रीचे संबंध ठेवले होते तेच संबंध अशोक कायम ठेवले होते .

शिलालेखावरून सम्राज्य , स्वतंत्र राजा व संरक्षित राज्ये कोणती याचा बोध होतो .. सम्राट अशोकाच्या राज्याचा विस्तार त्यांनी ठिकठिकाणी निर्माण केलेल्या लेखा वरून कळू शकतो . जिथे कुठे लेख उत्कीर्ण केलेला आहे , तो भुभाग व त्याच्या आसपासचा प्रदेश किंवा राज्य हे त्यांच्या साम्राज्यात मोडत असे .
मगध सम्राट देवानाम प्रियदरसीन राजा म्हणजे सम्राट अशोकाचे नांव डोळ्यापुढे येते . त्याची राजधानी पाटलीपुत्र येथे स्थापन करण्यात आली होती . सर विल्यम जीना यांनी ग्रीक उल्लेखावरून पाटलीपुत्र या मगध साम्राज्याच्या राजधानीची ओळख करून दिली . चंद्रगुप्त मौर्याने ही स्थापन केली . सेल्युक्सचा वकील मेगस्थनीज यांनी लिहिलेल्या माहितीवरून या विशाल नगराची कल्पना येते . पश्चिमेकडे मुंबई राज्यातील सोपारा येथे आणि गुजरात राज्यातील काठियावाड भागात गिरनार येथे सम्राट अशोकाचा शिलालेख उभारलेला आहे . याचाच अर्थ असा की , त्याच्या सम्राज्याच्या पश्चिमेकडील सीमा समुद्र किनान्यापर्यंत होती .

दक्षिणेकडील त्याचे साम्राज्य म्हैसूर राज्यातील ( हल्लीचे कर्नाटक राज्य ) चित उतलदुर्ग जिल्ह्यात आणि निझामस्टेट ( आंध्रप्रदेश ) मधील रायचूर जिल्ह्यात लेख आढळतात . म्हणून हा प्रदेश त्याच्या साम्राज्यात येत असे हे कळते . पुर्वेला जगन्नाथपूरी ( ओरीसा ) व गंजम जिल्ह्यातील ( मद्रास तामिळनाडू स्टेट ) जोगडा या प्राचीन परंतु आज भग्नावस्थेतील किल्ल्यातील परिसरात याचा शिलालेख आहे . गंजम या जिल्हा मुख्यालयाच्या शहरापासून वास्तव्येस अठरा मैल अंतरावर जोगडा येथे हा शिलालेख आहे . ऋषीकुल्प नदिच्या उत्तर किनाऱ्यावर जोगडा ( बहरमपूर तालुका ) हे ठिकाण आहे .

साम्राज्याच्या उत्तरेकडील सिमा प्रदेशात पेशावर व हजारा जिल्ह्यात शाहबाजगडी व मानसेहरा येथील प्रसिद्ध शिलालेख उभारलेले आहेत . कालसी येथे देखील शिलालेख आहेत . हे ठिकाण उत्तरेकडील डेहरादून जिल्ह्यात आहे . उत्तरेकडील सीमा पुढे पुर्वेकडे नेपाळच्या तराई प्रदेशापर्यंत विस्तारलेली आहे . कारण नेपाळच्या तराईत निगालीसागर व रुम्मनदेई येथील स्तंभलेख साम्राज्याची सिमा दर्शवितात . नामक आणि नाभपंक्ती वंशीय

राजे नेपाळच्या तराईत होते , असा उल्लेख आहे . पंचारण प्रदेशातील रामपुरवा येथील स्तंभलेख बीयापासून उत्तरेस साडे बत्तीस मैल दूर आहे . येथील स्तंभलेख बिहार राज्यात आहे . म्हणजे हा प्रदेश त्याच्या साम्राज्यात येत होता हे कळून येईल . रामपुरवा येथील एक भव्य वृशभशिल्प सध्या राष्ट्रपती भवन परिसरातील अशोकाभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे .

गयापासून उत्तरेस १५ मैलावर बराबर गुहेतील व सिद्धेश्वर येथील लेख हा प्रदेश साम्राज्यातील प्रदेश होता असे दर्शवितात . कलकत्ता वैराट येथील लेख म्हणजे हा प्रदेश देखील साम्राज्यात मोडत होता याचा पुरावा आहे . पाटलीपुत्र म्हणजे पाटणा येथून दक्षिणेकडिल बोध गया प्रदेशावर त्यांचा अधिकार होता . सम्राट अशोकांनी या पवित्र्य स्थळांना भेट दिल्याचा उल्लेख आहे . मगध म्हणजे हल्लीचा दक्षिण बिहारचा प्रदेश होय .. मगध प्रदेशाच्या पश्चिमेला बसलेल्या कोसम नावावरून त्याचा शिलालेख कोसंबी अलाहाबाद कोसम शिलालेख म्हणून प्रसिद्ध आहे . सम्राट अशोकानी आपली राज्यव्यवस्था अतिशय प्रगल्भ आणि शास्त्रीय तत्वानुसार स्थापन केली होती . त्यांनी साम्राज्याचे अनेक भाग पाडले होते . त्या भागावर म्हणजे प्रांतावर ‘ महामात्र ‘ या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती . कोसम स्तंभलेखावर सम्राटानी आपल्या प्रांतीय महामात्रांना आदेश दिले आहेत . कोसंबीच्या महामात्रास निर्देश दिले आहे म्हणजे त्या काळी कोसंबी प्रांताची राजधानी अथवा प्रमुख कार्यालयाचे स्थळ असावे असे दिसून येते .

इतर दुसऱ्या प्रांताचा उल्लेख धौली येथील शिलालेखात आलेला आहे . एक उज्जयनी ( उज्जयिनी ) आणि दुसरा तक्खसिला ( तक्षशिला ) प्रांत आहे .

उज्जैनी येथे अशोक यांची गव्हर्नर म्हणून नेमणूक केली होती . त्यावेळी कुमार सम्राट अशोकाचे पिताश्री बिंदूसार राज्यात होते . ग्वालीयर विभागातील अवंती प्रदेशातील उजैनी राजधानी होती . तक्षशिला हे ठिकाण पंजाबातील रावळपिंडी जिल्ह्यातील शाहदरी असावे असा अंदाज कॅनिगहॅमनी व्यक्त केला आहे .

साम्राज्याच्या दक्षिणेकडील सिमेचा विचार केल्यास पलिकडे चोड , पांडय आणि पुढे ताम्रपणी यांचे राज्य होते . चोड व पांड्य हे त्याकाळी प्रसिद्ध तामीळ वंश होते . ताम्रपर्णी म्हणजे आधुनिक सिलोन देश आहे . फार पूर्वी सिलोन भारताच्या दक्षिण टोकास रामेश्वरजवळ जुळलेला अखंड प्रदेश होता . कालांतराने नैसर्गिक उलथापालथ झाल्याने भारतापासून दूर झाला .

चोड किंवा चोलस ( सोल तामीळ भाषेत ) आणि ताम्रपणींचे राज्य मेगस्थनिसच्या काळात सर्व परिचीत राज्य होते . याशिवाय सतीयपुत्र ( सातियपुत्र ) आणि केरळ याचाही उल्लेख आढळतो . सतीयपुत्र यांच्याबद्दल समाधानकारक माहिती उपलब्ध नाही . परंतु केरळपुत्र म्हणजे केरळ किंवा मलबारचा राजा आहीम . सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या दक्षिण सिमेवरील शेजारी राष्ट्रात चोल , केरळपुत्र व सतियपुत्र याशिवाय पश्चिमेकडील सिमेलगतचे शेजारी राष्ट्र म्हणजे योन राजा अंटियोक आणि त्याचे इतर चार शेजारी राष्ट्र आहेत .

योन , कम्बोज , नामकस आणि नाभपंक्तीस ( नंमिती- शाहबाजगडी लेख ) व पिटीनिकस ( पिटीनिक्स – कालसी लेख ) आंध्र आणि परिदस याचा उल्लेख आढळतो. वायव्य सरहद प्रांतातील परदेशात या ग्रीक व यवन राजांनी आपापले लहान लहान राज्ये स्थापन केली आहे. सिंधु नदीच्या पश्चिमेकडील हा प्रदेशपूर्वी सेल्युकसनी चंद्रगुप्त मोर्यास दिला होता.
भोज व पिटीनिकस यांची राज्ये पश्चिमेकडील सिमेवर असावी अंदाज असा व्यक्त केला जातो .

याविषयी अधिक माहिती कश्मीरचा इतिहासकार कल्हण याच्या राज्यतरंगिणीतील माहितीनुसार उपलब्ध आहे . भोज राजा राजभोजाधिराज राजा संकरवर्मन हे समकालीन होते .

पूर्व किनाऱ्यावरील आंध्रप्रदेशातील तेलगु लोकांना आंध्र हे प्राचीन नांव आहे. मौर्य साम्राजाच्या पतनानंतर दक्षिणच्या पठारावरील फार मोठ्या प्रदेशावर आंध्र वंशातील राज्यानी राज्य केले आहे . प्लिनी यांनी मेगस्थनीसच्या माहितीच्या आधारे असे प्रतिपादित केले आहे की , अंघरी आंध्र ही शक्तिशाली व प्रभावी राष्ट्रशक्ती होती . आंध्रवं शीय राजाचे वेळी पारीद – पालद – पारद ही आदिवासी जमात देखील राज्यकर्ती होती असा उल्लेख आढळतो ( कालसी लेख ) ब्रम्हगिरी आणि सिद्धापूर शिलालेखावरून सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या दक्षिणेकडील प्रांताचे मुख्य ठिकाण सुवर्णगिरी असे होते . येथील राज्यकर्ता किंवा प्रमुख म्हणून , ज्याप्रमाणे उजैनी येथील प्रमुख म्हणून राजपुत्र अशोक होते , तसेच आर्यपुत्र राजपुत्र होते . सुवर्णगिरी येथील व्हाईसरायच्या हाताखाली ईसिला जिल्ह्यातील ब्रम्हगिरी व सिद्धापूर प्रदेश होता . ईसिला हे सिद्धापूरचे प्राचीन नाव असण्याची शक्यता आहे . सुवर्णगिरी आणि निझामच्या प्रदेशातील कनकगिरी ही एकच असावी . अशोकाचा शिलालेख असलेल्या मास्की या ठिकाणापासून दक्षिणेला सुवर्णगिरी वसलेते आहे . तर मद्रास प्रदेशातील ( तामिळनाडू ) बेल्लारी जिल्ह्यातील प्रसिद्ध विजयनगरपासून उत्तरेला सुवर्णगिरी आहे . हा सर्व प्रदेश सम्राटाच्या प्रदेशात होता . पूर्व किनाऱ्यावरील आपल्या प्रसिद्ध कलिंगस्वारीबद्दल सम्राट अशोक म्हणतात की , त्यावेळी त्यांच्या राज्याभिषेकाचे आठवे वर्ष होते . या प्रदेशात सम्राटानी घौली व जोगडा येथे दोन शिलालेख उत्कीर्ण करविले . येथील दोन वेगळे लेख कोरलेले आहेत . या लेखात सम्राटानी आपल्या तोसली प्रांतातील प्रमुख महामात्रास आदेश दिला आहे . तोसली या प्रदेशावर राज्यप्रमुख म्हणून राजपुत्र कुमार यांची नियुक्ती केली होती . जोगडा लेख असलेल्या प्रदेशाला समापा आणि जोगडा शिलाखंडाला , पर्वताला खेपिंगल असे संबोधीत होते .

बराबर पर्वताला प्राचीन नाव खलटिक होते असा स्पष्ट उल्लेख बराबर येथीत दुसऱ्या व तिसऱ्या शिलालेखात आहे . रुम्मीनदेईच्या स्तंभलेखात भगवान बुद्धाच्या जनमस्थळांचा उल्लेख लुम्बीनी असा केला आहे . बौद्ध साहित्यात लुम्बीनीला लुबीनी संबोधले आहे . नेपाळ तराईतील प्रसिद्ध असे स्थळ आहे . सम्राट अशोकानी आपल्या काही शेजाऱ्या आदिवासी विषयी उल्लेख केलेला आहे . त्यात योन , कंबोज शिवाय गंधारचे रधिक ( रिस्टीक , राष्ट्रीय , गिरणार ) आणि  पिटिनिक ( पिटनिक , पटेनिक ) प्रमुख आहेत . कंबोज म्हणजे आधुनिक काबूल आहे . गंधार सध्या वायव्य सरहद प्रातात समाविष्ट आहे . सि-यु-कीच्या वेळी त्याची राजधानी पुरुषपूर – पेशावर होती. रथीक किंवा ( राष्टीक ) म्हणजे काठीयावाढ येथील लोकांना म्हणत असावेत आणि त्याच्या गव्हर्नरला राष्टीक असे म्हणत असावे . पिटिनिक किंवा पिटनिक म्हणजे कोण हे कळले नाही.

सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेविषयी विचार केला तर असे दिसून येईल की , त्यांच्या साम्राज्यातील जे प्रदेश राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहेत , जसे उजैनी , तोसली आणि सुवर्णगिरी या प्रांताचा राज्यकारभार आपल्या राज – पुत्राकडे सोपविला होता . त्यांना कुमार किंवा आर्यपुत्र म्हणत असत . कुमार हे राजपुत्र असत आणि आर्यपुत्र हे कोण्या नातेवाईकांचे चिरंजीव असत . सम्राट अशोकांनी गादीवर बसण्यासाठी आपल्या सर्वभावाना ठार केले . इतिहासकारांनी , पुराणांनी सम्राट अशोकाने आपले भाऊ ठार केले असा अनेक ग्रंधातून चुकिचा प्रचार – प्रसार केला आहे. कारण अशोकाने बुद्धविचाराला , नैतिकतेला प्राधान्य देऊन जातियवादी प्रवृत्तीचा विरोध केला व समतेच्या तत्वावर समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्या विरोधकांनी पुढे त्यांच्याबद्दल चुकिचा इतिहास सादर करण्याचा प्रयत्न केलेले आहे . परंतु ते तद्दन खोटे आहे . कारण स्तंभलेख पाचवर उल्लेख आहे कि , पाटलीपुत्र व इतर शहरात त्यांचे भाऊ – बहिणी आणि इतर नातेवाईकांचे स्वतंत्र घर , खोल्या होते म्हणजे त्याचे सर्व कुटुंबीय व नातेवाईक जीवंत होते . त्यांची दुसरी पत्नी चारुवाकी आणि तिचा पुत्र तिवर होता.

सम्राट अशोकाच्या कार्यकाळात गिरणार प्रदेशावर त्यांचा यवन राजा तुशास्फ राज्य करित होता . प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नराला राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून काही उच्चपदस्थ अधिकारी नेमले होते . त्यांनाच प्रादेशिक म्हणत असत . प्रत्येक प्रांतातील जिल्ह्यात असे महामात्र नेमले होते . रसिला व सुवर्णगिरी येथील महामात्र राजाच्या हाताखाली कार्य करीत होते . महामात्र परिषद ( मंत्रीमंडळ ) स्थापन केली होती . कार्यपद्धतीनेच अशोकांच्या राजवटीला महाबलाढ्य व महान नैतिक राजवट ठरविले आहे . त्यांना राजा सरळ आदेश ( शिलालेख ३ ) देत असत . कोसंबी येथील लेखात तसेच पाटलीपुत्र आणि राणीच्या लेखात कोसंबीच्या महामात्रास , सारनाथ येथील लेखात तसेच पाटलीपुत्र आणि राणीच्या लेखात त्या प्रांतातील सर्व महामात्राना आदेश देण्यात आले आहेत . धौली व समापा येथील महामात्राना न्यायदानाचे अधिकार दिले होते . ( नगर व्यवहारक – नागरक ) ( धौली आणि जोगड ) याशिवाय सिमेवर असणाऱ्या राष्ट्रावर नजर ठेवण्याची जबाबदारी दिली होती . आपल्या राज्यभिषेकाच्या तेराव्या वर्षी धर्ममहामात्र नेमले होते . लोकात नितिमत्तेचे धडे देण्यासाठी यांची नेमणूक होती . विशेष महामात्र खास करून ब्राम्हण , बौद्ध , आजिविक निरग्रंधी आणि इतर संप्रदायाच्या लोकांच्या कल्याणाकरिता नेमले होते . याशिवाय समाजातील महत्त्वाचा घटक म्हणजे स्त्रियांचा गट याच्या कल्याणासाठी किंवा ज्या सरकारी योजना असतील त्यावर लक्ष देण्यासाठी स्त्री अध्यक्ष महामात्र यांची नियुक्ती केली होती ( बारावा शिलालेख ) महामात्र म्हणजे मंत्री या अर्थी बौद्ध साहित्यात उल्लेख आढळतो.

दुसरा अधिकारी वर्ग म्हणजे राजुक किंवा लाजुक होता . त्याचे कार्यक्षेत्र काही लाख लोकसंख्येसाठी त्यांची नियुक्ती होती . चांगल्या सज्जनाना शासकीय बक्षीसे आणि दुर्जनांना शिक्षा किंवा दंड देण्याचे अधिकार होता. रज्जूगाहक म्हणजे दोर धरणारा असा अर्थ आहे . याचे काम म्हणजे जमीन मोजणे , तळ्यासरोवरातील पाणी वाटप तसेच गावातील कारागीराकडून , जसे बाटई , लाकूड कापणारे , लोहार इत्यादि कडून वसूल करण्याचे काम होते . आधुनिक पटवा ऱ्यास त्यावेळी रज्जुक म्हणत असत . याशिवाय सेक्रेटरीचे काम करणारा युतस – युक्तस होता. तो महामात्राला कार्यालयीन कामात मदत करित होता . युत हे प्रांताचे अधिकारी होते . याना राजाकार्याशिवाय धर्मप्रचारासाठी आपल्य जनपद क्षेत्रात दौरे करावे लागत होते .

आज विदेश मंत्र्यालयाच्या कार्यासारखे कार्यालय त्यावेळी होते . राजाचा दूर वकील म्हणून सम्राट अशोकानी शेजारच्या पांड्य , चोल , सिलोन आणि इतर पाच देशात आपले वकिल नेमले होते . सम्राट अशोकाच्या दरबारात डियोनिसीयस हा ऑलेमी द्वितीय फिलाडेल्फस ऑफ इतिप्तचा वकील होता . मेगस्थनीस हा सेल्यूकसचा वकील होता.

त्यावेळी राजा आपले जासूस – गुप्तहेर इतर राष्ट्राकडील गुप्त माहिती गोळा करावयास आणि त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त करीत असे . यानाच गुढपुरुष किंवा एजन्ट देखील म्हणत त्याचे तीन गट असत . पहिला उच्च, मध्यम आणि कनिष्ठ ते राज्याच्या विश्वासातील असून लजुकावर आणि इतर बहुसंख्य लोकावर लक्ष ठेवित होते . याशिवाय राजाला साम्राज्यातील सर्व घडामोडीची माहिती देण्यासाठी प्रतिवेदक ( रिपोर्टर ) होते राजा कुठेही असला तरी वेळी अवेळी देखील सर्व माहिती देणे ही त्याची जबाबदारी होती . अशोकाने राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून इतर अधिकारी व सेवक नियुक्त केले होते.

अशोकाच्या शिलालेखावरून थोड्या माहितीच्या आधारे व बौद्धमाहित्यातील उपलब्ध माहितीवरून अशोकांच्या राज्याचे पाच विभाग प्रांत पाडले होते . प्रत्येक प्रांतावर एक प्रमुख प्रांताधीश नियुक्त केले जाते प्रांताप्रमुख राजवंशीय कुमार किंवा आर्यपुत्र असायचे . पण काही प्रांतावर इतराची देखील नियुक्ती केली होती . ( चंद्रगुप्त मौर्य – प्राभरी पृ . १४४-४५ ) त्याप्रमाणे खालील प्रांत पडले होते . गांधार ( तक्षशिला राजधानी ) , अवती ( उज्जैनी राजधानी ) , कलिंग ( तोसली राजधानी ) दक्षिणापथ ( सुबर्णगिरी राजधानी ) आणि गृहांत पाटलीपुत्र येथून स्वतः कारभार सम्राट आपल्या महामात्रा मार्फत पाहात होते . याशिवाय प्रांताचे विभाजन शेवटच्या व्यवस्थेपर्यंत होते . कोटल्यानी सविस्तर माहिती दिली आहे . चंद्रगुप्त मौर्यानी सौराष्ट्र आपल्या साम्राज्याचा एक प्रांत करून त्यावर प्रांतपति म्हणून वैश्यवंशीय पुष्पगुप्त यांस नेमले होते . याच पुष्पगुप्ताने प्रजेच्या कल्याणाकरिता सुदर्शन नावाच्या भव्य अशा सरोवराची निर्मिती केली होती . ( पोलिटीकल हिस्ट्री ऑफ एन्शीयंट इंडिया डॉ . राय चौधरी ) कौटल्याने सांगितले आहे की , ” राजाने चातुर्वर्ण व्यवस्था ठेवली पाहिजे , ” परंतु हा उपदेश समान नागरिकत्व घडविण्यासाठी व समतेच्या विरोधी होता . लोकशाहीच्या विरोधात हा विचार होता . बुद्धविचार हा गणराज्य पद्धतिला गती देणारा आहे आणि सम्राट अशोक राजा बौद्धधर्मिय असल्यावर आणि धर्मात जातीपातीला धारा नसतांना सम्राट अशोक असे दृष्कृत्य कसे काय करू शकेल ? मौर्य वंशाच्या राजवटीत सर्वास समान वागणूक दिली जात होती . बौद्ध धर्म जात मानत नाही . मग राजाचे कर्तव्य सांगतांना अयोग्य असे कौटिल्य सांगतात असे वाटते . ” राजा स्वत:ला प्रजेचा ऋणी असून ते ऋण फेडण्यासाठी त्याची सेवा करतो . ” ही त्याची ऋद्धा होती . विदेशी निती सहअस्तित्व आणि शांती यावर आधारित होती . चंद्रगुप्तापासून अशोक महान पर्यंत साम्राज्यची विदेश निती मैत्रीपूर्ण होती . सिरियाच्या राजाशी मौर्य बिंदुसारांनी पत्रव्यवहार केला होता . अशोकाने धर्मविजय आणि धर्मप्रचाराकरिता अन्तियोक , इजिप्तचा राजा तुरमाय तसेच अनेक यवन राजाशी त्याचे मैत्रीचे संबंध होते.

( तेरावा लेख ) साम्राज्यात शिष्टाचार म्हणजे कोणताही सर्वसधारण नागरिक घोडा किया हत्ती बाळगीत नसे . त्याला तशी परवानगी नव्हती . बुलहरनी सांगितल्याप्रमाणे मेघातिथी हत्तीपाळीव करणे व विक्री करणे ही राजकीय बाब होती . याकरिता खास व्यक्तिची नेमणूक केली होती . यांना अस्वाध्यक्ष , हस्तध्यक्ष म्हणत असत . शिलालेख बारा वरील उल्लेख , ब्रचभूमिक म्हणजे गायीची माहिती ठेवणारा अधिकारी असावा असे वाटते . पशु ठेवण्याच्या जागेला पशुशाला असे म्हणत होते . राजा तेथे जात असे . अशा वेळी राजा तेथे असतांना देखील गुप्त माहिती देता येईल असा नियम होता . शिलालेखाच्या शेवटी लिपीकर , लिहिणारा असा उल्लेख म्हैसूर येथील तीन लेखाचे शेवटी खरोष्टीत आहे . हा लिपीकर वायव्य सरहद प्रांतातील रहिवासी असावा असे खरोष्टीलिपीवरुन वाटते . ‘ लिपीकरेन ‘ असा खरोष्टीतील शब्द प्रयोग आहे . उणादिसुत्रवरील भाष्यात लिपी शब्द लिप म्हणजे पोतणे – साररवणे पासून झाला आहे . खरोष्टीत लिपीऐवजी डीपी असा अॅकिमेनिडन लिपीतील शब्द आढळतो . लिखीत , लेखीत , लिखापित ऐवजी निपीस्त , निपेसिता , निपेसपित लिहिले आहे . ( शाहबाजगढी लेख ) या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील निशापित – चिरडणे शब्दापासून नसून प्राचीन पर्शियन निपीश म्हणजे लिहिणे या शब्दापासून झाली आहे . ‘ अशी भ्रम डिपी निपीस्त ‘ ही नीती तत्वावरील लिपी लिहिली आहे . असा शाहबाजगडी येथील उल्लेख करतांना वापरलेली लिपी ही इराण व सिरिया देशातील प्राचीन अक्षरासारखी लिपी आहे , असे वाटते . डेरिअस बेहिस्थानच्या स्तंभ चार आणि झेरझेस बॅन येथील लेखात डिपीम नियापीसम व डिपीम निपीस्तनाई असे कोरले आहे . यावरुन डिपी किंवा निपीस्त हे भारतीय शब्द नसून प्राचीन पर्शियन भाषेतून पानिनी पूर्वी घेतले आहेत . सिंधू व गंधार हे पार्शियन साम्राज्यात होते . खरोष्टी शब्द हे पर्शियन भाषेतील आहेत . अशोकांनी आपल्या शिलालेखात व इतर लेखात सुरुवातीचे शब्द ” देवानप्रिय प्रियदर्शीनलाजा हेवम अहा ” देवानप्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणतो , हे त्यांनी डेरीअस यांच्या अँकिमेनिडन पद्धतीवरून घेतले आहे .
डेरिअस असा म्हणतो
तुशास्क या गिरणारच्या गव्हर्नर यवन राजाचे नाव पर्शियन वाटते . जसे विस्टास्फ , केरेस्तास्फ , या पशिंकन नावासारखे आहे . यावरून सम्राट अशोकानी राज्यात आपल्या इराणीयन लोकांना नौकरीवर ठेवले होते असे कळून येईल . मॅगस्थेनिस यांनी निरिक्षक अथवा इन्स्पेक्टर याचा उल्लेख केला आहे . राज्यातील सर्व माहिती गोळा करून राजास कळविणे हे कार्य होते . या कामाकरिता वैश्यातर्फे सैन्यातील सैनिकांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येत असे . या कामासाठी अत्यंत चाणाक्ष व विश्वासपात्र अश्या व्यक्ती नियुक्ती करण्यात येत असे , असे स्ट्रेणो देखील म्हणतो .

गुन्हेगारांना शिक्षा देतांना त्याचे अवयव कापून टाकण्यात येत असे . शिक्षा मृत्युदंड देखील दिला जात होता . हे युनार्क लेखकांच्या अहवालात नमूद केले आहे . याउलट कौटिल्य म्हणतात की , दंड निती इतकी कठोर नव्हती शिक्षा देतांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा अशा सूचना दिल्या आहेत . चंद्रगुप्ताचे वेळी चोरी कैली की त्याला फाशीची शिक्षा देत असत . ती अशोकाने कमी केली . जन्मपेठ झालेल्यांना वर्षातून तीन दिवस माफ करण्यात येत असे . फाशिची शिक्षा झालेल्यांना वर्षातून तीन दिवस माफ करण्यात येत असे . फाशिची शिक्षा झालेल्यांना तीन दिवस सुट्टी मिळत होती . असा मध्यम मार्ग शिक्षेसंबंधी होता .

नगरव्यावहारिक संबंधी धौली व जोगड लेखात उल्लेख आहे . ते नगरातील कारभारावर लक्ष पुरवित होते . त्यांचा हुद्या महामात्रासमान होता तसेच महामात्र देखील नगरव्यावहारिक म्हणून नियुक्त केले जात होते . धौली येथील पहिल्या अतिरिक्त लेखात अशोकांनी आदेश दिला की , तोषालीचे ( महामात्र ) नगरव्यावहारिक देखील आहेत जौगु पहिला अतिरिक्त लेखात अशोकांनी असे म्हटले आहे की , ” समापायं महामाता नगल वियोहालक हैव वतविया ” यावरुन देखील असे कळले की , दोन्ही अधिकारी एकाच श्रेणीचे होते.

आपल्या राज्यकारभाराच्या सव्वीसाव्या वर्षी धर्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी पुरुष नामक अधिकारी नेमले होते आणि ते धर्मोपदेश कार्यात मदत करतील असे म्हटले आहे ( पहिला स्तंभलेख ) तसेच सीमेवरील देशातील लोकांना धर्माचे शिक्षण देण्यासाठी अंतमहामात्र यांची नेमणूक केली होती . पुरुष नामक अधिकारी तीन श्रेणीचे होते . वरीष्ठ, सामान्य आणि मध्यम श्रेणी , पुरुष अधिकारी रज्जुकांच्या कार्यावर देखरेख करीत होते , पुरुशा अपि च में उत्कृष्ट गम्या:च मध्यमा. सम्राट अशोकाचा राज्यकारभार त्यानी नेमलेल्या अनेक अधिकाऱ्यामार्फत अत्यंत सुरळीत व सफलतापूर्वक चालत होता . राज्यातील लोकोपयोगी कल्याण कार्याकरिता नियुक्त अधिकाऱ्याची मंत्रीपरिषद भरवून त्यात झालेल्या कार्याचा आढावा घेणे , जे काम अपूर्ण आहेत ते त्वरित पूर्ण करणे , नविन कामे सुरु करणे

आपले कार्य करताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग शोधून काढणे इत्यादी विषयावर मतभेद अथवा विवाद उद्भवला तर ती माहिती त्वरित सम्राटाना देण्यात यावी . अशा आज्ञा दिल्या होत्या . यावर सम्राट आपला निर्णय देऊन परिषदेचे कार्य सुकर केले जात होते.

राज्यकारभार लोककल्याणासाठी चालविला जातो किंवा नाही हे तपासण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी काही अधिकाऱ्यांना आपापल्या भागात दौरे काढून प्रजेदर्शन जाऊन त्यांना लाभ मिळतो अथवा नाही याची माहिती गोळा करावी असे आदेश होते . प्रजेचे हित व कल्याण म्हणजे सम्राटाचे आदकर्तव्य असे समजत होते . प्रजेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी सदैव पराक्रम करीत राहावे असे त्यांना वाटत होते . प्रजा माझी मुले आहेत . त्यांचे सुख व कल्याण हे माझे कर्तव्य आहे . अशी त्यांची कल्पना होती . सर्व अधिकान्यांनी व लोकांनी निष्पक्षतापूर्वक व न्यायसंमतवृत्तीने लोकहितासाठी सदैव कार्यरत रहावे असे त्यांचे आदेश होते . ‘ परक्रमतेसत्र लोकहितये ‘ सम्राट स्वतःला प्रजेचा पिता समजून त्याची सेवा व संरक्षण करणे हे आपले आद कर्तव्य समजत होते . त्यांनी आपला राज्यकारभार चालविण्याकरिता आणि शत्रूपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी चंद्रगुप्तापासून जी सैन्यरचना आणि लढाईसाठी आवश्यक ती सर्व शस्त्रसामग्री होती त्यात काहीही घट केली नाही . याबाबतीत ते जितके मऊ तितकेच ते शत्रूसाठी कठोर होते . याची साक्ष आपणास त्यांच्या तेराव्या शिलालेखातील आदेशावरून पटते . आदिवासी जमात अटवीच्या उपद्रवी कारवायाप्रसंगी त्यांना आपल्या सैन्य शक्तीची जाणीव करून दिली आहे . अहिंसेचे तत्व जरी प्रजेसाठी व सम्राटासाठी होते . तरी देखील देशाच्या संरक्षणासाठी शस्त्र हाती घेणे याचे बंधन नाही हे त्यांनी दाखवून दिले .मानव जातीला अनुसरण करण्यासाठी धर्माचरण हेच श्रेष्ठ आहे हे त्यांनी जगाला आपल्या कार्याद्वारे जगाला पटवून दिले आहे.

राज्यकारभार सुरळीत चालण्याकरिता भारतात अथवा जगातील इतर राष्ट्रात जशी राज्यकारभार पद्धती आज आहे , तितकी यथायोग्य आणि प्रभावशाली अशी होती . हे आपणास त्यांनी मंत्रिमंडळापासून तर ग्रामपंचायतीपर्यंत नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या मनुष्यबळावरून दिसून येईल . ही पद्धत शांततेच्या काळात जितकी आवश्यक आहे तितकीच युद्ध काळात देखील आवश्यक व महत्त्वाची आहे . या रचनेला पुरक अशी त्यांची सैनिक व्यवस्था देखील होती.
सम्राट अशोकांनी आपल्या साम्राज्या सभोवताल जी शेजारी राष्ट्रे होती त्याच्याशी शांती , सहअस्तित्वाचे व मैत्रीचे संबंध प्रस्तापित केले होते . विश्वशांतीसाठी जेणेकरून सर्व मानवजात व पशुपक्षी सुखी व्हावेत यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते . याच उद्देश्याने प्रेरित होऊन सिमेवरील शेजारी राष्ट्राना आपली निती प्रतिपादित केली . ” आपण घाबरू नका , भितीचे कारणच नाही . अगदी निश्चित राहा . माझ्याकडून सुख शांती प्राप्त करा . दुःखी होऊ नका ” धौली लेखात असा स्पष्ट आदेश दिला आहे . असे लिखित अभिवचन दिले आहे . मनुष्याच्या भल्याकरिता ते सदैव झटत होते . तसेच त्यांचे सर्व अधिकारी देखील सदैव सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी झटावे , असे आदेश दिले होते .
पशुपक्षाच्या कल्याणासाठी त्यांनी व्रजभूमीक नांवाचे अधिकारी नियुक्त केले होते . त्यांनी राज्यातील पशूसाठी ( रक्षण सुखशाती ) औषधालय स्थापण करून औषधी गुणयुक्त लागवड करावी . विहिरी आणि पिण्यासाठी प्याऊ , पशूसाठी हौद , विश्राम गृह , सावलीसाठी रस्त्याशेजारी अमराई तयार करावी व देखरेख करावी असे आदेश होते . ( कालसी दुसरा लेख ) धर्म व शील यावर त्याचा अतिशय भर होता . ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ‘ यामुळेच विश्वकल्याण व शांती स्थापित होऊ शकेल यावर त्यांची शद्धा होती.

विश्वशांतीसाठी प्रयत्न करतांना त्यांनी शस्त्राचा वापर अजिबात टाळला नाही . त्यांची सैनिक शक्ति पूर्वी होती तशीच त्याने पुढे कायम ठेवली . सैन्य शक्तिवर देखील तितकेच लक्ष होते . त्यांच्या संरक्षण व्यवस्थेविषयी आपणास कळून येईल की , ती सहा भागात विभागली होती . त्यावर राजाला मदत करण्यासाठी तीस सदस्याची महासमिती होती . ही समिती सहा उपसमितीत विभागली होती . सहा प्रकारची सैन्य व्यवस्था पाहायला या सहा उपसमित्या होत्या .

१ ) पहिला विभाग नौसेना , २ ) दुसरा विभाग साहित्य , अन्नधान्य आणि जनावरांना चारावैरण याची जबाबदारी होती . बॅन्ड व घोड्यांना शिक्षण देणे , इत्यादी कामे होती . ३ ) तिसरा विभाग पायदळ सैन्य विभाग , ४ ) चवथा विभाग अश्वसेना , ५ ) पाचवा विभाग रथसेना व ६ ) सहावा विभाग हत्ती सेना होता .

प्रत्येक विभागासाठी एक प्रमुख अध्यक्ष होता . याशिवाय कौटिल्य अर्थशास्त्रातील उल्लेख सैनिकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक चिकित्सा विभाग देखील होता … यात सेवा करण्यास स्त्रियांची नियुक्ती करण्यात येत असे . कौटिल्यानी पायदळाची पुन्हा सहा विभागात रचना सांगितली आहे .
पहिली सेना म्हणजे मौल सेना . ही राजाची निजी पेतृक सेना होती .
दुसरी मृतकसेना ही भाड्यावर ठेवलेली सेना होती .
श्रेणी सेना म्हणजे जन्मजात सैनिकांचा धंदा असलेली जमात .
मित्रबल म्हणजे मित्र राष्ट्राची सेना .
अमित्रबल म्हणजे शत्रूच्या राज्यात भरती केलेले सैन्यबळ आणि अटवीबल यात जंगली प्रदेशातील आदिवासी लोकांचे सैन्य होते .

एका तुकडीत २०० पायदळ , १० हत्ती , १० रथ आणि ५० अश्वरोही राहत असत . यावर एक प्रमुख होता . अशा १० कंपन्याचा प्रमुख सेनापती होता . १० सेनापतीच्या वर एक नायक असायचा . राजाच्या सेवेत असतांना मृत्यु झाला तर त्याच्या मुलाबाळांना मृत सैनिकाचे वेतन जीवननिर्वाह निधी म्हणून दिला जात असे . महासेनापती म्हणजे सैन्यातील सर्वश्रेष्ठ असा अधिकारी समजला जात असे . उत्कृष्ट संघटक युद्धकौशल्य निपून असा प्रमुख या पदावर आरुढ होत असे . हत्ती घोडे आणि रथ हे भारतीय सेनेचे प्रमुख अंग होते .. भारतीय सैन्यात हत्ती प्रमुख असणे महत्त्वाचे होते . हत्तीना शिक्षण देऊन लढाईत तरबेज करण्याचे , त्यांची काळजी घेण्याचे आणि त्यांच्या आजारावर उपचार करणे इत्यादी सर्व कामे हस्त्याध्यक्षावर सोपविण्यात आले होते.

लढाईत शस्त्र , यंत्र , आयु आणि बारुद वापरून तयार केलेले आग्नेयास्त्र याचा वापर करण्यात येत होता . सैनिकाला स्वतःचे रक्षण करण्यास चिलखत , ढाल इत्यादि दिले जात होते . लढाईच्या मैदानात उत्तरलेल्या घोड़ा , हत्ती व रथाला अलंकार आभूषणांनी सजवून रणभेदी वाजवून युद्धाला सुरुवात करीत होते .

लढाई शुरु होण्यापूर्वी मंत्रयुद्ध आणि कुटयुद्ध प्रकाराचा वापर करण्यात येत असे . चालून आलेला राजा प्रथम तयार शेजारी राजाकडून ज्या राजावर स्वारी करायची आहे त्याची समज घालून शरण येण्यास युचविणे हा याचा प्रमुख उद्देश्य होता . हे जर सफल झाले नाही तर मग कुटयुद्ध पद्धतिचा वापर करीत . यात आपले गुप्तहेर पाठवून शत्रुकडे तोडफोड करणे , करविणे , दाम , साम याचा वापर करणे , संघराज्यात भेद निर्माण करून पूर पाडणे , घातपात कृत्य करणे , याचा समावेश होता . त्यावेळी संघराज्ये म्हणून मगध साम्राज्यात कांबोज सुराष्ट्र , क्षत्रिय श्रेणी , लिच्छविक , ब्रजिक , मल्लक , मद्रक , कुकूर व पांचाल याचा समावेश होता . या कामासाठी स्त्रिया , विधवा , वेश्या , नर्तकी , गायिका यांचा स्त्रिगुप्तचर म्हणून वापर करीत होते . याप्रकाराने जर शत्रू शरण येत नसेल अथवा आपले वर्चस्व मान्य करीत नसेल तर मग युद्ध सुरु करावे लागत होते . त्यात राजा आपल्या सैन्याला उद्देश्यून भाषण करीत असे की , ” आपण व मी स्वतः राज्याचे पगारी नौकर आहोत . या राज्यात आपणास आणि मला जिवंत राहून उपभोग घ्यावयाचा आहे . म्हणून माझ्या आज्ञेनुसार शत्रूचा विनास करावयाचा आहे . ” अशा भाषणामुळे सैन्यात राष्ट्रभक्ति व राष्ट्रप्रेम उफाळून येवून युद्धात निकराने लढून विजय प्राप्त करीत होते . अशाप्रकारे मौर्यकालीन सैनिक व्यवस्था होती . चंद्रगुप्ताच्या वेळी त्यांचे सैन्यबळ बलाढ्य व संघटीत होते . त्याच्या सैन्यदलात सहा लाख पायदळ सैन्य , तीन हजार घोडदळ , नऊ हजार हत्ती आणि नऊ हजार रथ , इतके बलाढ्य सैन्यदल असतांना आणि त्याची रचना सम्राट अशोकापावेतो सुगठीत व शिस्तबद्ध असतांना मगध राज्याकडे कोणत्याही शत्रूला वाकडी नजर करून बघण्याचे धाडस कुणाकडेही नव्हते . या सैन्य बळावर व बुद्धिकौशल्यामुळे मगधचे साम्राज्य संपूर्ण भारतावर होते . सम्राट अशोक यांनी आपल्या एका शिलालेखात उत्कीर्ण केले आहे की , सर्व मानव माझी संतान आहे . ( सर्व मुनिसे पजायमा ) आणि दुसऱ्या एका लेखात म्हणतात की , जनहिताला मी आपले सर्वश्रेष्ट कार्य समजतो . खरे पाहिले व वास्तविक विचार केला तर सम्राट अशोक सर्व मानवाची सेवा करणारे एक महामानव होते . सद्धम्म आणि राजकारण यांचे एकत्रीकरण करून एवढे मोठे साम्राज्य चालविणे जगातील कोणत्याही माणसाला सम्राट अशोकाशिवाय शक्य झालेले नाही

🔹🔹🔹🔹🔹🔹