दिनांक 29 ऑगस्ट 2021(रविवार) रोजी भिक्खू संघाला राजीव नगर येथील राजीव वसाहत येथील राजगृह बुध्दविहारातील महाप्रजापती गौतमी महिला संघाच्या वतीने भोजनदान,फलाहार दान ,व आर्थिक दान,चिवरदान करून पुण्यअर्जित करण्यात आले.
त्यांच्या दानकर्मास भिक्षु वर्षावास उपासक उपासिका कमिटीच्या वतीने त्रिवार साधुकार.बुध्द धम्म व संघ प्रतापाने मंगल होवो.
आज बौद्धाचार्य-मिलिंद बनसोडे गुरुजी,उपासक पी.कुमार धनविजय, उपासक अशोक गवई,उपासक विनोद त्रिभुवन, उपासक बाळासाहेब पाईकराव,उपासक भारत भवरे, उपासक किरण काऊतकर, उपासक सुनिल गायकवाड,, उपासक राहूल तायडे,उपासक अमोल खंदारे,उपासिका मंदाकिनीताई दाणी,उपासिका गोकर्णाबाई वानखेडे आदी. धम्मसेवा दिली.
आजचा रविवारचा 8 वा ऑनलाइन धम्मसंस्कार वर्ग राजगृह बुध्दविहारात संपन्न झाला. या धम्म संस्कार वर्गाचे प्रशिक्षक पुज्य भन्ते अश्वजित( थेरो) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपासक देवीदास गायकवाड यांनी तांत्रिक सहायक म्हणून धम्मसंस्कार वर्गाची जबाबदारी पार पाडली.
दानदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मंगल मैत्री
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?