March 2, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक रोड येथे संविधान दिन उत्साहात साजरा Constitution Day celebrated with enthusiasm at Nashik Road

नाशिक रोड परिसरात संविधान दिन अत्यंत उत्साहात आणि एकात्मतेच्या भावनेतून साजरा करण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा तसेच विविध सामाजिक संघटनांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. या उपक्रमात बुद्धिस्ट भारत तर्फेही महत्वपूर्ण योगदान देण्यात आले.

कार्यक्रमातील सर्व घडामोडी, भाषणे आणि सामूहिक संविधान वाचनाचे दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले.

याप्रसंगी नाशिक रोडचे PI पंडित अहिरे साहेब विशेष उपस्थित होते. त्यांच्या सोबत सिद्धार्थ भालेराव, आकाश भालेराव, गौरव काळे आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

संविधानातील मूल्ये जन-जनापर्यंत पोहोचावीत आणि समाजात बंधुता, समता आणि न्यायाचे तत्व रुजावे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू होता. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.