क्रोधाला प्रेमाने जिंकता येते,
लोभाला त्यागाने,
असत्याला सत्याने जिंकता येते
हे सांगणारा, शिकवणारा,
सिद्धार्थ गौतम बुद्ध…
कुणावर अपार प्रेम नाही,
कुणाचा तिरस्कार नाही,
मनात प्रत्येकाबद्दल करुणा
असणारं निरामय रुप,
तथागत गौतम बुद्ध…
कुणाचा अतिसन्मान नाही,
अतिप्रशंसा नाही,
कुणाचा अपमानही नाही…
तटस्थपणे चिकित्सा करणारा,
महामानव गौतम बुद्ध…
कुणाला आशीर्वाद नाही ,
कुणाला शाप अथवा वरदान नाही,
‘माणूस’ म्हणून जगण्याचा,
मार्ग दाखवितो,
महामानव गौतम बुद्ध…
अल्प नाही,अती नाही…
सम्यक , मधला मार्ग शिकवितो,
सूक्ष्म अणू ते अकाशाऐवढा मोठा,
संपूर्ण विश्व व्यापून उरणारा,
तथागत गौतम बुद्ध ..
आथांग असून शाश्वत सत्य सांगतो
अभेद्य विचार मांडतो,
नाही कोणता अवतार ,
नाही तो कल्पीत देव वगैरे…
जो शुद्ध , प्रकाशमय तो बुद्ध
एक संतुलीत दृष्टीकोनचा,
जन्म , मृत्यु , आजारपण ,
म्हातारपण असणारा,
आपल्यासारखाच माणूस,
म्हणजे गौतम बुद्ध…
मानव कल्याणाचा मार्ग सांगणारा,
विश्वाला दया , क्षमा , शांती
शिकविणारा विवेकी मानव,
तथागत गौतम बुद्ध…..
अष्टांगमार्ग , त्रीशरण आणि
पंचशीलाने मानवी जीवन,
सुखी करण्याची शिकवण देणारे सर्वोत्तम भूमिपूत्र,
म्हणजे गौतम बुद्ध .
बुद्धम् सरणम् गच्छामि…!
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण