January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

चेंबूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर येथे मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहतात. त्या पार्श्वभूमीवर आज एम पश्चिम विभागाच्या सभागृहात सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार तुकाराम काते, पोलीस सहआयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर, सहआयुक्त श्री. शंकर भोसले, श्री. संतोष निकाळजे आणि विविध स्थानिक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन व समिती यांच्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.