चेंबूरमध्ये खासदार राहुल शेवाळे यांना जनतेने हाकलले
बाबासाहेबांना हार घालण्याची तुझी लायकी नाही. गद्दारीला थारा नाही… आंबेडकर उद्यानातच भीमसैनिकांचा हिसका
मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) – मिंधे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना गुरुवारी रात्री चेंबूरमध्ये संतप्त आंबेडकरी अनुयायांच्या रोषाला सामोरे जावे लागले. चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार शेवाळे आले होते, परंतु त्यांना हजारो भीमसैनिकांनी गेटजवळच रोखून धरले. ‘तुझी लायकी नाही बाबासाहेबांना हार घालायची! चालता हो !’ असे म्हणत भीमसैनिकांनी शेवाळे यांना अक्षरश: हाकलून लावले. त्यांचा संताप पाहून शेवाळे यांना घाम फुटला. काही अनुचित घडण्यापूर्वीच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेच्या धास्तीने नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या उद्यानातील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केला.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चेंबूरच्या आंबेडकर उद्यानात हजारो आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास स्थानिक खासदार राहुल शेवाळे हे सुद्धा तिथे
| मुख्यमंत्र्यांनी धास्तीने पूर्वनियोजित कार्यक्रम केला रद्द आले. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ते पुढे जात असतानाच भीमसैनिकांनी त्यांना रोखले. त्यांना पुष्पहार अर्पण करण्यास मनाई करत गद्दारांना येथे थारा नाही, असे ठणकावले. भीमसैनिकांचा रुद्रावतार पाहून शेवाळेंबरोबरच त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली. सुरक्षेचा विचार करून तिथून माघारी जाणेच योग्य असल्याचे पोलिसांनी शेवाळे यांना सांगितले. या घटनेचे वृत्त कळताच उद्यानाच्या परिसरात काही मिनिटांतच हजारो भीमसैनिकांची गर्दी झाली. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ केली. याच उद्यानात अशोकस्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. त्या स्तंभाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. त्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार होते, परंतु शेवाळे यांची झालेली अवस्था कानावर येताच मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रमच रद्द केला. लोढा यांनीही तिकडे जाणे टाळले. आठवले आले, पण तेसुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करून लगेच गेले
More Stories
भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष, भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे १२७ वर्षांनी भारतात परत येऊ शकले
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक येवला कामासंदर्भात आज मुंबईत मंत्रालयात आढावा बैठक
भारताचे सॉफ्ट पॉवर टूल म्हणून बौद्ध धर्म: दक्षिणपूर्व आणि पूर्व आशियामध्ये पंतप्रधान मोदींचे डिप्लोमॅटिक प्लेबुक