🧘♂️ भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना, विश्वाला प्रेम, दया आणि शांतीचा संदेश द्यायला सांगितला.
👥 गौतम बुद्धांचे असंख्य शिष्य होते. त्यापैकी एक होता, ‘पूर्णा.’ त्याची साधना पूर्ण झाली होती. म्हणून तो बुद्धांना म्हणाला, ‘भगवान, आता आपण मला अनुज्ञा द्या.
👌 मला आता बाहेर पडून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपला उपदेश पोचवायचा आहे.
🤔 भगवान म्हणाले, ‘ठीक आहे. माझी अनुज्ञा आहे. परंतु मला अगोदर सांग, तू कुठे जाणार आहेस ?
🌎 पूर्णा म्हणाला, ‘भगवान, बिहारमध्ये सुखा नावाचा एक छोटासा प्रदेश आहे.
🚫 जिथे अजून आपल्यापैकी कोणीही भिक्खू गेलला नाही आणि तिथल्या लोकांना आपल्या उपदेशाचा लाभ झालेला नाही. म्हणून मी प्रसारासाठी मुद्दाम या प्रदेशाची निवड केली.’
😐 भगवान म्हणाले, ‘अरे, तिकडे कोणीही भिक्खू गेला नाही, याला कारण आहे. तिथले लोक फार वाईट आहेत म्हणे !
❓ तू तिथे गेलास, तर कदाचित ते तुझा अपमान करतील, मग तू काय करणार ?’
🤷♂️ पूर्णा म्हणाला, ‘भगवान, मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी नुसता अपमानच केला. शिव्या वगैरे दिल्या, पण मारले तर नाही ना.’
❓ भगवान म्हणाले, ‘समजा, एखाद्याने तुला खरोखरच मारले, तर तू काय करशील ?’
🤷♂️ पूर्णा म्हणाला, ‘भगवान, तरीही मी त्यांना धन्यवाद देईन. कारण त्यांनी मला नुसते मारले, जीव तर नाही घेतला.’
❓ भगवान म्हणाले, ‘तुला आता आणखी एक, शेवटचा प्रश्न विचारतो. समजा, त्यांपैकी एकाने तुला जिवे मारले, तर तू काय करशील ?’
🤷♂️ पूर्णा म्हणाला, ‘भगवान, याही अवस्थेत मी त्यांचा ऋणीच राहीन. कारण, त्यांनी मला जीवनमुक्ती दिली. नाहीतर कदाचित मी पुढे जीवनात बहवून गेलो असतो.’
👍 यावर संतुष्ट होऊन भगवान बुद्ध म्हणाले, ‘पूर्णा, तू माझ्या परीक्षेला पूर्ण उतरलास. आता तू हवे त्या ठिकाणी जाऊन प्रचारकार्य करू शकतोस.
✔️ कारण, तू कुठेही गेलास तरी सर्वजण तुला तुझे कुटुंबीय वाटतील. ज्याचे हृदय असे प्रेमाने सदैव भरलेले असते, त्याला जगातील कोणतीही व्यक्ती इजा करू शकत नाही.’
More Stories
🪷 तथागत भगवान बुद्ध, योग आणि विपश्यना : आत्मशुद्धीचा खरा मार्ग 🪷
बुद्ध धम्म (बौद्ध धर्म) हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे Buddha Dhamma (Buddhism) is the path to liberation from suffering.
गौतम बुद्धांचे 10 प्रेरणादायी विचार 10 Inspirational Thoughts of Gautama Buddha