June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धम्माची महती….

💞🌹🍀🌸🥀🍁🍂🍀🌹💞

कधी कळणार लोकांना
बौद्ध धम्माची महती….
बौद्ध धम्मात मुळीच नाही
या उपासा-तापासाची भिती….

बौद्ध धम्माला लागतो
फक्त वैज्ञानिक दृष्टिकोण….
पटले तर घ्या
नाहीतर जबरदस्ती करणार नाही कोण….

तुमच्या देवळात लावावी लागते
नवसाची लांब लचक line….
आमच्यात फक्त बुद्धांचे विचार
आत्मसात करा

And u will be absolutely fine…

बरं त्या बदल्यात बुद्ध
काहीही मागत नाही….
देवाला मात्र द्यावे लागते
पैशांसकट सर्व काही….

प्रत्येक देव तुम्हाला
त्यांच्यासमोर झुकायला लावतात….
बुद्ध मात्र त्यांच्या विचारांनी
स्वाभिमानाने जगायला लावतात….

तरीही आम्ही झुकतो त्यांच्यापुढे
पण त्यांनी सांगितले म्हणून नाही….
तर त्यांनी दिलेल्या मार्गाने चाललोय
म्हणून आमच्यावर कोणाची
बोट उचलायची हिम्मत नाही….

असा साधा आणि सरळ
आमचा बौद्ध धम्म आहे….
एका स्वच्छ काचेसारखी
त्यात पारदर्शकता आहे…

ना कुठली लपवाछपवी
ना पुजेचा पसारा….
ना देव कोपायची भिती
फक्त विज्ञानाचा आसरा….

या भारताला बौद्ध धम्माशिवाय
नाही आता कुठलाच थारा….
तो दिवस आता दुर नाही
” जेव्हा हा भारत बौद्धमय होईल सारा. ”
” जेव्हा हा भारत बौद्धमय होईल सारा. ”

जय भिम 🙏 नमो बुद्धाय

💞🌹🍀🌸🥀🍁🍂🍀🌹💞