February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

तथागत गौतमबुद्ध आणि शेतकरी

एके दिवशी एक शेतकरी तथागत गौतमबुद्धांकडे आला आणि म्हणाला, तथागत मी एक सामान्य शेतकरी आहे. मी बिया पेरतो, नांगर हाकतो आणि धान्य उत्पादन करतो व नंतर ते ग्रहण करतो. पण माझ्या मनाला समाधान-शांती मिळत नाही. मला असे काहीतरी करायचे आहे जे माझ्या शेतात माझ्या इच्छेप्रमाणे तृप्तीचे (अमरत्वाचे) फळ देईल. तुम्ही मला असे मार्गदर्शन करा ज्यामुळे माझ्या शेतात माझ्या मनाप्रमाणे (अमरत्वाचे ) फळ वाढू लागतील…
हे ऐकून बुद्ध हसले आणि म्हणाले….
भल्या माणसा तुला अमरत्वाचे फळ मिळू शकेल, परंतु यासाठी
तुला तुझ्या शेतात बी पेरून नाहीतर मनात बी पेराव लागेल .
हे ऐकून शेतकरी आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, भगवंता हे काय सांगता आहात? असं कसं शक्य आहे,
मनात बी पेरल्यावर कसं फळ भेटेल ….?
बुध्द म्हणाले का शक्य नाही…. चांगल्या मनाने बी पेरल्यावर तुला फळ मिळू शकेल , तु नक्कीच हे करू शकतो आणि या बियाण्यांमधून तुला मिळणारे फळ साधरण नसून अनन्य साधरण फळ आसेल , जे तुझे जीवन यशस्वी करेल आणि तुला दाखवेल चांगुलपणाचा मार्ग…
शेतकरी म्हणाला, भगवंत मला कृपया सांगा की , मी माझ्या मनात बीज कसे पेरू ?
बुद्ध म्हणाले, “तु मनात विश्वासाचे बी पेर, शहाणपणाने विवेकाने नांगर फिरव, ज्ञानाच्या पाण्याने ते भिजव आणि त्यामध्ये नम्रतेचे खत घाल.
त्यापासून तुला अमरत्वाचे फळ मिळेल. ते ग्रहण केल्याने तुझी सर्व दु: ख दूर होईल…
तुला असिम शांतीची अनुभूती येईल …
बुद्धाकडून अमरत्वाच्या फळाची प्राप्तीचा उपदेश ऐकून त्या शेतकऱ्याचे डोळे उघडले.
त्याला समजून चुकले की अमरत्वाचे फळ केवळ चांगल्या
विचारधारेद्वारेच मिळू शकते .