April 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

Bodhagaya : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळ्यात पहिली बैठक.

23 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सिद्धार्थ बुद्ध विहार, मांडा टिटवाळा (मुंबई) येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भाने एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. *बैठकीचे आयोजक विजय तांबे सर* यांनी महाराष्ट्रातून या आंदोलनासाठी पाहिजे तशी मदत होताना दिसत नाही याची खंत व्यक्त केली.

समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य संघटक मार्शल अनिकेत उबाळे  यांनी या बैठकीची व आंदोलनाची भूमिका मांडली. समता सैनिक दलाचा या आंदोलनासाठी सुरुवातीपासून सहभाग लोकांसमोर मांडला. उपस्थित आद. ॲड. अनिल कांबळे सर यांनी या BT Act 1949 च्या संदर्भाने काही महत्वाच्या बाबी सर्वांसमोर मांडल्या. बैठकीत उपस्थित सर्वांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. येणाऱ्या दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये बैठकांचे सत्र सुरु होईल.
*सदर सभेचे अध्यक्ष म्हणून बहुजन उत्थान सेवा समितीचे अध्यक्ष विजय भोईर सर* यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.
सदर बैठकीस समता सैनिक दलातर्फे आद. मार्शल सुरेश जाधव सर तसेच वासिंद वरून मार्शल रविंद्र पवार उपस्थित होते.
सदर सभेत समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती, बहुजन समाज पार्टी अशा विविध धार्मिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे कार्यकर्ते आंबिवली, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, ऐरोली, नवी मुंबई, ठाणे येथून उपस्थित होते.