April 17, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम महामानवास अभिवादनासाठी सुटा-बुटात निघाले भीमसैनिक

सूट-बूट, टाय आणि कोट घालून तसेच महामानवाच्या विचारांचे फलक, निळे झेंडे हाती घेऊन महारॅलीत सहभागी झालेले भीमसैनिक.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला रविवारी (दि. १३) सायंकाळी भाभानगरातील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ते शालिमार परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत महारॅली काढण्यात आली. सूट-बूट, टाय आणि कोट घालून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भीम सैनिकांनी मुंबई नाकामार्गे चालत जाऊन शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात बुद्धभीम गीतांचा ‘तुझ्याच पाऊल खुणा भीमराया‘ कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना व बीएमए ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत हजारो संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम प्रथमच राबविण्यात आला. रॅलीमध्ये बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघ, समता शिक्षक परिषद, नाशिक, व्होकेशनल एज्युकेशन अॅण्ड ट्रेनिंग बुद्धिस्ट एम्प्लॉयी असोसिएशन नाशिक, स्वयंदीप प्रबोधनी संस्था, राणेनगर, फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, सातपूर, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, पाथर्डी व नाशिकरोड यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.