July 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजन धम्म प्रेरणा पुरस्कारांचे वितरण

BMA Group Nashik

BMA Group Nashik

नाशिक : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त रविवारी ( दि. २) सायंकाळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलातर्फे भीम गीतांचा कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्यांचा ‘धम्म प्रेरणा’ पुरस्कार सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला. पाथर्डी फाटा येथील दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संदेश उमप व प्रवीण डोणे यांच्यातर्फे ‘वामन नव्या दमाने‘ गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.
राहुल बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. लयबद्ध स्वरात सादर झालेला गीत गायनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला. प्रमुख अतिथी विवेक गायकवाड म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजबांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांनी एकसंध राहण्याचा संदेश दिला. शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. संस्थेचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शैलेश अढांगळे, योगेश अढांगळे उपस्थित होते.
खालील पैकी मान्यवर अधिकारी यांना पुरस्कार वाटप करण्यात आले

बाबासाहेब पारधे (अपर जिल्हाधिकारी, नाशिक), प्रदीप पोळ (उपायुक्त, आदिवासी विभाग ठाणे), सुदर्शन नागरे (उपायुक्त, आदिवासी विभाग, नाशिक), डॉ. भगवान वीर (प्रादेशिक उपसंचालक, नाशिक), मच्छिंद्र दोंदे (सहायक आयुक्त, सेवा कर विभाग), श्रीकांत गांगुर्डे (अपर कर आयुक्त, जालना), सिद्धार्थ ठाकरे (उपायुक्त, दहशतवाद विरोधी पथक, नाशिक), डॉ. बी. एस. नरवाडे (प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग, नाशिक), चंद्रशेखर पगारे (प्रादेशिक उपायुक्त, बालकल्याण विभाग, नाशिक), गौतम बलसाणे (जिल्हा उपनिबंधक), अमोल बागुल (मुख्याधिकारी, एरंडोल), संजय गायकवाड (उपजिल्हाधिकारी), संगीता निकम (सहायक उपायुक्त), वंदना कोचुरे (प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, मुंबई).