July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

BMA Group आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्द्ल बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला

Nashik : BMA Group आयोजित धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्याबद्द्ल आयु. राऊत मॅडम ( DCP Nashik ), आयु. देशमुख साहेब ( ACP Nashik ), आयु.पगार सर ( PI Indira Nagar ) यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

BMA Group ग्रुपच्या वतीने  2010 पासून त्रिरश्मी बुद्ध लेणी च्या पायथ्याशी सम्राट अशोक विजयादशमी निमित्ताने धम्मचक्र अनु प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

नाशिक गोल क्लब येथे BMA Group ग्रुप च्या वतीने 1000 श्रामनांचे शिबिर आयोजित केले जाते सदर शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील बांधव श्रामनेर बनतात दहा दिवस असलेले श्रामनेर शिबिराचे समारोप सम्राट अशोक विजयदशमीच्या दिवशी त्रिरश्मी बौद्ध लेणीच्या पायथ्याशी दरवर्षी संपन्न होत असतो परंतु यावर्षी ऐतिहासिक महाबोधी वृक्ष महोत्सव 2023  कार्यक्रम शांतीदूत चारिटेबल ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपन्न होणार होता त्याकरिता बौद्ध धम्म गुरु दलाई लामा हे सुद्धा उपस्थित राहणार होते त्यामुळे प्रशासनाने इतर सर्व कार्यक्रमास परवानगी देण्याचे नाकारले होते परंतु प्रशासनास दोन्ही कार्यक्रमाचे स्थळ हे वेगवेगळे असते हे प्रत्यक्षदर्शी दाखवून देण्यात आले आणि दोन्ही कार्यक्रमाच्या वेळ ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे प्रशासनाच्या लक्षात आले आणि त्यांनी बी एम ए ग्रुपच्या कार्यक्रमास परवानगी दिली.

सालाबादप्रमाणे  धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन  कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला ज्या मान्यवर अधिकाऱ्याने सहकार्य केले त्यांच्या बाबत BMA Group च्या वतीने समाजभूषण आयु.मोहन भाऊ आढागळे यांनी आयु. राऊत मॅडम ( DCP Nashik ), आयु. देशमुख साहेब ( ACP Nashik ),  आयु.पगार सर ( PI Indira Nagar )  अधिकारी वर्गास भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार केला.