बुलढाणा : ‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क’तर्फे बुलढाण्यात काढण्यात आलेला महामोर्चा आंबेडकरी समाजाचे जंगी शक्तिप्रदर्शन ठरले. या मोर्च्यात महिलांसह भिक्कुसंघही मोठ्या संख्येने व जिद्दीने सहभागी झाले.
रविवारी दुपारी बुलढाणा चिखली राज्यमार्गावरील जुने डीएड महाविद्यालय, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली. ऐतिहासिक भोन गावपरिसरातील मौर्यकालीन बुद्ध स्तूप आणि अवशेष नष्ट करण्याचे कारस्थान करणाऱ्या राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम आणि राष्ट्रीय प्रभारी विलास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्च्यात आंबेडकरी समाज, संघटनेचे पदाधिकारी, सभासद, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठी देवी, वन कार्यालय, तहसिल चौक, स्टेट बँक चौक मार्गे निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयावर येऊन धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यानंतर जिजामाता प्रेक्षागार नजीक सभा पार पडली.
More Stories
HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी
श्रीलंकेतील बौद्ध मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली
‘बौद्ध धर्मासाठी बुद्ध आवश्यक आहे का ?’: DOGE मधून बाहेर पडताना एलोन मस्क