स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष पुणे जिल्ह्याच्या वतीने मा. पोलीस उपायुक्त साहेब झोन ४, चंदननगर, पुणे याना १ जानेवारी भिमा कोरेगाव विजयस्तंभाला आभिवादन करण्यास येणाऱ्या भिम अनुयायांना विविध सुविधा पुरविणेबाबतनिवेदन देण्यात आले
सदर निवेदनात खालील प्रमाणे मागण्या
१ जानेवारी २०२६ रोजी भिमाकोरेगाव येथे शूर सैनिकांस आभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो नागरिक येत असतात. तथापि सदर ठिकाणी नागरिकांना अनेक असुविधा असून नागरिकांसाठी खालील सुविधा पुरविण्यात याव्यात ही विनंती.
१. लोणी कंद पासून ते भिमाकोरेगाव स्तंभापर्यंत लहान मुले वृद्ध स्त्री-पुरूषांची नागरिकांची ने-आण करण्यासाठी बस सेवा उपलब्ध करून बससाठी स्तंभापर्यंत स्वतंत्रपणे मार्ग आरक्षित ठेवावा.
२. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी.
३. विजय स्तंभ परिसरात मनोहर उर्फ संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना सदर कार्यक्रमादरम्यान १ महिना पुणे जिल्ह्याबंदी करण्यात यावी.
४. सदर ठिकाणी फुगे, खेळणी इत्यादिं वस्तूंच्या दुकानास परवानगी देऊ नये. कारण सदर दुकानांमुळे सदर दिवशी जत्रेचे स्वरूप येऊन अप्रत्यक्षपणे शौर्यदिनाचे महत्त्व कमी होते.
५. आभिवादनासाठी येणाऱ्या व्हीआयपी अनुयांसाठी आत मध्ये जाणाऱ्यासाठी व्हीआयपी स्वतंत्र एन्ट्री गेट बरोबरच त्यांचे स्वतंत्र एक्झिट गेट असावे. असे मा. आनंद घेडे (नेते पुणे जिल्हा) अॅड. सिमा पाचरणे शहर अध्यक्ष, पिपंरी-चिंचवड पुणे, मा. जीवनभाऊ घोंगडे (अध्यक्ष, पुणे शहर / जिल्हा ) यांनी निवेदन दिले
More Stories
पिप्रहवा येथील अवशेष दिल्लीतील लाडो सराई येथे आले
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री