February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर ( ताडोबा अभयारण्य संघारामगिरी, चंद्रपूर ) यांची धम्मदेसना

स्त्रोतागामी श्रावक संघ आणि फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक संस्था यांच्या वतीने

भन्ते ज्ञानज्योती महास्थवीर ( ताडोबा अभयारण्य संघारामगिरी, चंद्रपूर ) यांची धम्मदेसना

“काही धर्मात स्वर्गप्राप्ती हे ध्येय सांगितले जाते आणि मेल्याशिवाय स्वर्गप्राप्ती होत नाही हेही सांगितले जाते. पण स्वर्गात गेल्याचे एकही उदाहरण दिले जात नाही. पण बौद्ध धर्मात निर्वाणप्राप्ती हे ध्येय आहे. स्त्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी व अर्हत असे चार महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. स्त्रोत म्हणजे प्रवाह. हा प्रवाह की जो

निर्वाणपदाकडे जाणारा आहे. स्त्रोतापन्न होण्यासाठी सत्कायदृष्टी, शीलव्रतपरामर्श आणि विचिकिच्छा ही तीन बंधने नष्ट करावी लागतात. सत्कायदृष्टी म्हणजे चुकीची दृष्टी, शीलव्रत परामर्श म्हणजे कर्मकांड करणे आणि विचिकिच्छा म्हणजे बुद्ध धम्म-संघ या त्रिरत्नांवर खात्री पटली तरी उगीचच शंका घेणे. ज्याने ही तीन बंधने नष्ट केली तो स्त्रोतापन्न अवस्थेला जातो आणि स्त्रोतापन्न पदाला पोहोचलेली व्यक्ती कधीही खाली घसरत नाही. प्राचीन भारतात हजारो भिक्षू, आचार्य आणि उपासक स्त्रोतापन्न पदाच्या पुढे म्हणजे अहंतपदाला गेलेले होते. एवढे ते चारित्र्यसंपन्न, नितीसंपन्न, निष्कलंक आणि प्रकांड पंडीत होते.

भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासात इसवीसन पूर्व ६ वे शतक (भगवान बुद्धांपासून) ते इ. स. १२ वे शतक

(मुस्लीम आक्रमणापर्यंत) म्हणजे ६००+१२०० = १८०० वर्षे बौद्ध धर्म या देशात होता. चीन, जपान, ब्रह्मदेश इत्यादि देशात बौद्ध धर्म अजूनपर्यंत अस्तित्वात आहे. परंतु हा धर्म फक्त भारतातूनच नाहीसा कसा झाला? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे.. भारतात इ.स. १२०० मध्ये बौद्ध धर्माचा -हास आणि पतन झाले तसेच देशात जातीव्यवस्थेचा, विषमतेचा कहर झाला. त्याचा परिणाम असा झाला देश ८०० वर्षे मुसलमान व इंग्रजांचा गुलाम झाला. आपणाला व देशाला पुन्हा गुलाम होऊ द्यायचे नसेल तर सुवर्णयुग निर्माण करणाऱ्या बौद्ध धर्माचे अस्तित्त्व देशात अबाधित राहिले पाहिजे.

प्राचीनकाळी जसे आचरणशील व विद्वान भिक्षू होते त्याच श्रेष्ठ पदाला गेलेले भन्ते ज्ञानज्योती आज आपणाला | लाभले आहेत. भन्ते ज्ञानज्योती हे ताडोबाच्या जंगलात वास्तव्य करीत असतात. तरी अशा उच्च कोटीच्या भन्ते ज्ञानज्योती यांचा धर्मोपदेश ग्रहणशील चित्ताने ऐकण्यासाठी आपण जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आहे. कळावे,

आपले विनीत :

शाक्यमुनी : 8530767536

असित गांगुर्डे : 9822424447

दिलीप लगड :  9623066191

डॉ. संग्राम साळवे : 9762268113

डी. टी. भोसले : 9158028848

द. ना. जाधव  9423581226

शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ सायं. ५ ते ८

स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे ११.

Bhante Gyanjyoti Mahasthavir Dhamma Desana