February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या तयारीचा ‘बार्टी’ने आढावा घेतला. बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टॉल

सोमवार, २५ डिसेंबर २०२३ :
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी जय्यत तयारी, अनुयायांसाठींच्या विविध सुविधांच्या तयारीचा आढावाव जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी विधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर बार्टीतर्फे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून वाचन प्रेमीसाठी ३०० पुस्तक स्टॉल उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली. बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी प्रशासनातर्फे अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला, अनुयायांच्या अभिवादनाचे नियोजन, प्रशासन देणार असणाऱ्या सुविधा, पार्किंगचे नियोजन, अनुयायांना विश्रांतीसाठीचा निवारा आदी बाबींचा आढावा घेतला. बार्टीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आहे.
आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयस्तंभच्या पाठीमागील भव्य जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तकाचे दालन अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणार
यावेळी अंतर्गत रस्ते, बॅरीकेट, प्रसिद्धी माध्यमांची स्वतंत्र व्यवस्था, भिखु संघ, समता सैनिक दल, महार रेजिमेंटची मानवंदना, हिरकणी कक्ष, पोलिस मदत व नियंत्रण कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, स्वच्छतेचे नियोजन आदी सुविधांचा आढावा घेतला, यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि भिमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.