धम्म परिषद • ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन, जागरूक राहण्याचा आवाहन केले
देशात मॉरल पोलिसिंग कायदा आणण्याचा प्रयत्न होत असून घटनेने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य या कायद्यामुळे नष्ट करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही आतापासूनच जागरूक रहा, असा सल्ला अँड. प्रकाश आंबेडकर यांनी धम्म परिषदेत दिला.
नाशिकमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या धम्म परिषदेस राज्याच्या विविध भागांतून डॉ. आंबेडकरांचे अनुयायी आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, या देशात आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्ने होतात. समाजव्यवस्थेने ते स्वीकारले आहेत असे त्यांनी सांगितले २०२४ मध्ये देशात संतांतर करायचे असल्यास आता पासून सुरवात करावी लागेल असे त्यांनी भाषणात प्रबोधन केले .
पंतप्रधान मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी चीन व अमेरीकेचे पेमेंट गेटवे बंद करून दाखवावे. या गेटवेच्या माध्यमातून दरवर्षी चीनला भारतातून १० हजार कोटी रुपये जातात. आपल्याच पैशांचा वापर करून चीन आपल्याशी लढत आहे. आपण सैन्याचे हात बांधून ठेवल्यामुळे चीनने आपली जागा बळकावली आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले
मंदिर आंदोलनामुळे मिळाले आरक्षण: काळाराम मंदिराचे आंदोलन पाच वर्षे का चालवले याची माहिती देताना अँड. आंबेडकर म्हणाले, हे आंदोलन डोक्याने चालवण्यात आले. काळाराम मंदिर हे आंदोलनाचे प्रतीक आहे. त्यावेळी इंग्लंडमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेत भारतातील कायद्यांचे मसुदे तयार होत होते. या पाच वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याचे लक्षात आणून दिले. मात्र पहिली परिषद त्यातील विकृतीचा मुद्दा धरून तसा काँग्रेसने रद्द केली. दुसऱ्या गोलमेज कायदा करण्याचा प्रयत्न होत आहे. परिषदेच्यावेळी आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्याचे सांगत परिषदेने आपल्याला सहभागी करून घेण्यासाठी विशेष अधिकार दिले. त्यामुळे आरक्षण मिळाले आहे.
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न