June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चळवळ – अशोक नागकिर्ती

तुकड्या तुकड्यात चळवळ
सारे करती वळवळ
चळवळीचा किती वाईट काळ
सौदेबाजीचा करतात खेळ
सत्तेसाठी घोटतात लाळ
एकमेका मनात मळमळ
चौकात ओकतात गरळ
गळ्यात अहंकाराची माळ
नका उठवू बदनामीची राळ
कधी होतील हे सरळ
एकीची नाही कळकळ
एकीचे किती महान बळ
स्वार्थांधांना का नाही कळ
लोकशाहीची कुठे आहेत फळ
शत्रूचा लोकशाही विरोधी जाळ
राजकारणाचा पुरता झाला खेळ
नाही कोणाचा कोणाला ताळमेळ
विकासाचा घोळात घोळ
विचलित कराया जाळपोळ
बाबासाहेबांची उपाशी बाळ
जोडणार कधी नितीमत्तेशी नाळ
बाबासाहेबांची लेकर ओशाळ

रचना :– अशोक नागकिर्ती
दिनांक :– २२/१०/२०२२
मोबाईल :– 7506852842
कोणताही बदल करू नये.सर्व हक्क रचनाकाराचे.