January 15, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

हिंदु म्हणुन मरणार नाही

अन्याय अपमानाने
जगणे आता होणार नाही
जरी जन्मलो हिंदु म्हणुन
पण हिंदु म्हणुन मरणार नाही

आघात झालेले मन
करु लागले आक्रोश
जाईल सामोरे धाडसाने
माघार मात्र घेणार नाही
हिंदु म्हणुन मरणार नाही

सुर्य तो लुप्त झालेला
पसरवतो प्रकाश आहे
मिच तुमचा ज्वालामुखी
अंधार कधी होणार नाही
हिंदु म्हणुन मरणार नाही

22 प्रतिज्ञा अंगीकारुन
शरण मी बुद्धवचनां जाईल
घेऊन शिकवण पंचशिलेची
देव कोणतेच पुजणार नाही
हिंदु म्हणुन मरणार नाही

 

 

मैत्रीपुर्ण सादर जय भिम, नमो बुद्धाय

अर्चना उके चव्हाण , नागपुर