दिन विशेष स्पर्धा समूह
विषय : तेजस्वी विचारांचा महासागर
शीर्षक : रथ समतेचा
आणला मी रथ समतेचा
धरा सावरून बांधवांनो माझ्या
कित्येक जंगले तूडवित आलो
ओढूनीया सागरी लाटा
तुडवित मार्ग चिखलदर्यांचे
झेलीत घाव काट्याकुट्यांचे
आणला मी रथ समतेचा //१//
धगधगत्या ज्वालामूखी सम
लाव्हारसाच्या तप्त उद्वेकाने
आला बाहेर दिव्य प्रखरतेने
नेण्यास तिमीरा कडून तेजा कडे
आणला मी रथ समतेचा //२//
राहिलो एका लहानग्या खोलीत
केला अभ्यास रस्त्यावर
ना पाहिली कधी टेबल खुर्ची
ज्ञानार्जन केले बसून पोत्यावर
प्रकाश ज्ञानाचा तेवत ठेवण्यास
आणला मी रथ समतेचा //३//
जगती या जंगलच सारे
पसरले वैरी माझेच सारे
मानवतेची कमालच येथे
यातना तीव्र माणसाला जेथे
नष्ट यास करावया
आणला मी रथ समतेचा //४//
गुलामात होती गणतीच माझी
अन् जीवन माझे होते सलामात
तोडली मी बेडी गुलामगिरीची
अशी जात माझी झुंजणारी होती
काढण्यास बाहेर वेदनेतून
आणला मी रथ समतेचा //५//
जाणली निती गौतमांची
करुन आचरण धम्मपदाचे
धम्म मार्गाने होती निवारण
बुद्धा़च्या तत्वज्ञाना मुळे
संविधान दिले हक्क जाणून घेण्यास
आणला मी रथ समतेचा
धरा सावरुन बांधवांनो माझ्या //६//
अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012
More Stories
बाबा तुम्ही नसतात तर
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण