January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

खेळ खंडोबा शिक्षणाचा

खेळ खंडोबा शिक्षणाचा

कोरोनाच्या काळात
शाळा झाल्या बंद
पोरं होणार का शिक्षित
घडणार कसं भविष्य !

आॅनलाईन अभ्यास
खरंच झाला का मित्रांनो ?
की सोडवले पेपर आपण पालकांनो
असा हा काळ जिव घेणा आला

प्रतिभावंत विद्यार्थी
जातील हो वगळत
शुन्यच येईल हाती
गोळा बेरीज करत

चालणार कसा बघा
जगाचा हो हिशोब
अडाणीच बसले आता
हुद्द्यावर शेवट

खुपसल्या जात आहे
डोक्यात खंजर
भांडवलशाही अन् हुकूमशाहीचा
डोईवर बसला मंजर

शिक्षणाचा मांडलाय खेळखंडोबा
वाढते झाड झाले खुरटे
बेजार केले बाल मना
शिक्षण झाले आज फिरते

कान्वेंटचा लागला प्रत्येकाला चस्का
अपेक्षेपोटी पोरांवर गस्ता
पालक जातो सारा पिचून
शिक्षण शुल्क भरुन

दुध, साय, लोणी तुप सारं एकच
आॅनलाईन अभ्यासाचे झाले दुष्परिणामच
काहींचे गेले जीव तर काही रंगले गेमात

खेळ मांडलाय चिमुकल्यांच्या भविष्याचा
फालतुपणा आहे सुरु शिक्षणाच्या नावाचा
वाढेल गुन्हेगारी भविष्यात हमखास
बंद करा बाजार शिक्षणाचा
माणुसकीला जपता यावे
सुसंस्कृत हे शिक्षण असावे

अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012